स्वदेशी खेळातून शारीरिक व बौद्धिक विकास

0
16

गोंदिया,दि.11 : स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा वास असतो. विद्यार्थ्यांचे शरीर व मन स्वस्थ असणे हीच त्यांच्या यशस्वीतेची पायरी आहे. यामुळेच स्वदेशी खेळ व संस्कृतीला मंडळाकडून जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून पुढे आणले जात आहे. कारण स्वदेशी खेळ कमी खर्चाचे व मेहनती असून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच शारीरिक व बौद्धिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कारंजा येथे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्यावतीने बुधवारी (दि.९) आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित होत्या. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ प्रत्येकच विद्यार्थ्याला त्याची योग्यता दाखविण्याची संधी देते. तेथेच पुरस्काराच्या माध्यमातून मंडळ उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना सन्मानीत करते. यातूनच अन्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असून तेच भविष्यातील स्पर्धांसाठी त्यांना अधीक योग्यरित्या तयार करीत असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला योगराज उपराडे, माधुरी हरिणखेडे, चमनलाल बिसेन, स्नेह गौतम, धनवंता उपराडे, महेंद्र शहारे, विजय बन्नाटे, प्रकाश रहमतकर, विमल नागपुरे, रजनी गौतम, विठोबा लिल्हारे, विजय लोणारे, कुंदन कटारे, खुशबू टेंभरे, भोजराज चुलपार, ओमप्रकाश भक्तवर्ती, इंद्रायणी कावळे, प्रिया बंसोड, प्रकाश डहाट, अखिलेश सेठ, जयप्रकाश बिसेन, किर्ती पटले, सुनिता दोनोडे, छाया दसरे, शामकला पाचे, कमलेश्वरी लिल्हारे, निता पटले, अनिल मते, विनिता टेंभरे, प्रमिला करचाल, प्रकाश देवाधारी, प्रकाश पटले यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.