मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

मुलगाच निघाला शिक्षक वडीलाचा मारेकरी

भंडारा,दि.11ः पवनी तालुक्यातील कोंढा परिसरातील सेंद्री आसगाव (चौ.) येथे संशयास्पद स्थितीत आढळुन आलेल्या त्या शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलीसांना यश आले असुन पैशाच्या वादातुन सख्या मुलानेच मित्राच्या मदतीने स्वत:च्या वडीलांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी मुलगा व त्याच्या मित्राला पोलीसांनी अटक केली असुन या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोंढा-कोसरा येथील लिलाधर तानबा जिभकाटे वय ५७ वर्ष हे मासळ येथील सुबोध महाविद्यालयात सहा.शिक्षक म्हणुन कार्यरत होते. दि.७ जानेवारी रोजी लिलाधर यांचा मृतदेह कोंढा येथील त्यांच्याच शेतात तयार करण्यात आलेल्या खड्डयात आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच अडयाळ पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक स्वप्नील जाधव यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना मृतदेहाच्या गळयावर दोरीने आवळल्याच्या खुणा दिसुन आल्याने लिलाधर जिभकाटे यांची हत्या करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला होता.अडयाळ पोलीस स्टेशन येथे सदर प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. जिल्हयात याच आठवडयात झालेल्या तुमसर येथील साहिल शेंद्र व ढिवरवाडा येथील दिलीप चौव्हाण यांचा खुनाचा उलगडा करणाºया भंडारा स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांच्याकडे लिलाधर जिभकाटे यांच्या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी त्यांच्या पथकासह कोंढा येथील गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन बारकाईने विचारपुस करीत अधिक माहिती मिळविण्याकामी खबºयांना कामी लावले.दरम्यान मृतक लिलाधर जिभकाटे आणि त्यांचा मोठा मुलगा मंगेश लिलाधर जिभकाटे यांचे नेहमी आपसात भांडण होत असल्याची माहिती पुढे आली.मंगेश हा उच्चशिक्षीत असुन त्याने एम.टेक.पर्यंतचे शिक्षण झाले असुन तो नागपूर येथे पुढील शिक्षण घेत होता व नेहमीच वडील लिलाधर जिभकाटे यांच्याकडे मोठया रकमेची मागणी करीत असल्याची माहिती खबºयांकडुन पोनि.रविंद्र मानकर यांना मिळाली.

प्राप्त माहितीवरून पोनि.मानकर यांनी मृतक लिलाधर यांचा मोठा मुलगा मंगेश याला ताब्यात घेवुन त्याची कसुन चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र रामचंद्र राजारम हिंगे रा.हसारा ह.मु. बसंतनगर गोंदिया याच्या मदतीने वडील लिलाधर जिभकाटे यांचा खुन केल्याचे कबुल केले.पोलीसांनी आरोपी मुलगा मंगेश लिलाधर जिभकाटे रा.कोंढा/कोसरा ह.मु.धंतोली नागपूर व त्याचा मित्र रामचंद्र राजारम हिंगे रा.हसारा ह.मु. बसंतनगर गोंदिया यांना अटक केली असुन पुढल तपास सुरू आहे.या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक विनीता साहु,अप्पर पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक स्वप्नील जाधव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर,सहा.पोनि.विजय पोटे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी- अधिकाºयांनी केली.

Share