बेरार टाईम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन व सत्कार कार्यक्रम संपन्न

0
10

जत/सांगली(राजेभक्षर जमादार),दि.11ः- समाजजागृतीचे कार्य लोकशाहीच्या चौथ्यास्तंभाकडून सातत्याने करण्यात येत असून देशाच्या स्वातंत्र्यापासून तर आजच्या घडीपर्यंत वृत्तपत्रांनी आपली जबाबदारी पार पाडले आहे.महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षाच्या दुष्काळाकडे बघितल्यास त्या दुष्काळाचे प्रतिबिंब आपल्या बातमीच्या माध्यमातून पत्रकार शासनाकडे पोचविण्याचे कार्य सातत्याने करीत असल्याचे उदगार मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केले.ते येथील आश्रमात आयोजित बेरार टाईम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.यावेळी सांगली जिल्ह्यातील जतकरीता राजभक्षर जमादार याची बेरार टाईम्स तालुका प्रतिनिधी पदी निवड झाल्या बदल तुकाराम महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याचवेळी विदर्भात लोकप्रिय ठरलेल्या न्युजपोर्टल व साप्ताहिक बेरार टाईम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन मठाधिपती तुकाराम महाराज, डॉ .भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते सपन्न झाले.यावेळी डॉ .दयानंद वाघोली,रावसाहेब पाटील,मैनुद्दीन जमादार सो.चे.व्हा.चेअरमन, राकेश काटे,इसाक जमादार,उपसंरपंच एम.आर.जिगजेणी,साहेबराव पाटील, सुनिल गाडघे पञकार ,केरप्पा हुवाळे पञकार,दिलीप वाघमारे,शाम राठोड,पडलवार बालाजी,कमाल जातगार,राजू लोहार,भूषण दिडवार,बुडेसाहेब,जातगार,देवाप्पा नरुटे,व्ही.बी.लोहार,हणमंतराव बिरादार,व्ही.बी.लोहार,ईश्वर बोरियाळ,शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते व ग्रामस्त उपस्थित होते.कार्ममाचे सुञसंचलन माझी सैनिक अब्बास सैय्यद यानीकेले तर आभार शेतकरी संघटनेचे कार्येकर्ते भिमाशंकर,बिरादार यांनी केले.