मुख्य बातम्या:
राजनांदगावच्या कंपनीला ५0 लाखांचा ठोठावला दंड# #टंचाईच्या २६४ उपाययोजनांच्या कामांना मान्यता# #प्रलंबित मागण्यांसाठी विज्युक्टाचे निवेदन# #जबरानजोत शेतकर्‍यांचा धडक मोर्चा# #विशाल हृदयी , विविध आयामी : डॉ विशाल बिसेन# #राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री# #इंडियन ऑईलच्या सामाजिक दायित्वातून आज दिव्यांगाना मिळणार सहायक उपकरणे# #गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित# #मुंबई, पुणे व नागपूर महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्याचा निर्णय- शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती# #दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध- चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांसाठी रोग निदान व आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन

लाखनी,दि.11ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ प्राथमिक, समर्थ बालक मंदिर आणि श्री समर्थ कॉन्व्हेंट, लाखनी येथे आज दि ११ जानेवारीला संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी व पालकांसाठी रोग निदान व आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ सोनाली भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात
ग्रामीण आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद भुते, डॉ.सोनाली भांडारकर, डॉ.शब्बीर शेख चर्म रोग, डॉ.सुफिया खान दंत चिकित्सक, ग्रामीण आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद भुते, डॉ.गणेश मोटघरे, डॉ.सचान नेत्र रोग तज्ञ, डॉ. लिलाधर हारोडे, डॉ.रवि हलमारे, डॉ.शरयू माटे, डॉ. स्नेहल सोनेवाने, डॉ.करंजेकर आदी तज्ञानी सहभाग घेतला होता.या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी. आपल्या आरोग्याची निगा कशी राखावी याबाबत सविस्तर माहिती दिली. दातांची काळजी, वेळोवेळी नख कापणे, डोळ्यांची निगा कशी राखायची याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. यात ५५० विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. आरोग्य शिबिरासाठी बालू फसाटे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक डू शं भांडारकर, मंगेश मरसकोले, वनिता माटे, बालक मंदिर प्रमुख उमा आगाशे, कॉन्व्हेंट प्रमुख प्राची धरमसारे, नितेश गायधनी, मनोहर कावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश भांडारकर, संचालन गुणवंत दिघोरे, आभार जयश्री निखाडे यांनी मानले.
Share