मुख्य बातम्या:

सालेकसा येथे ईव्हीएम सोबत VVPAT मार्गदर्शन रॅली

सालेकसा,दि.११ः–आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले प्रशासन सध्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपेट मशीनच्या मार्गदर्शन आणि प्रचार प्रसार मोहिमेला लागलेले आहेत. याच अनुषंगाने सालेकसा तालुक्यातील प्रशासन प्रचाराला लागलेले आहेत. आज (दि.११) पासून इव्हीएम माहिती प्रचार रॅलीला तहसीलदार रमेश भंडारी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. पोलीस स्टेशन सालेकसा येथे झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ईव्हीएम बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संपूर्ण तालुक्यातील जनतेस ईव्हीएम बद्दल माहिती पोहोचवण्यासाठी जनसंपर्क रॅलीचे शुभारंभ करण्यात आले. सदर बैठक तहसीलदार भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. नायब तहसीलदार ए. बी. भुरे, शिवराज खाडे, सालेकसा पोलीस  स्टेशनचे ठाणेदार राजकुमार डुनगे व इतर तहसील कार्यालयाचे व पोलीस स्टेशन सालेकसा चे कर्मचारी उपस्थित होते.
Share