जुमलेबाज सरकारपासून सावध रहा-अशोक चव्हाण

0
17

गोंदियात जनसंघर्ष यात्रेदरम्यान आयोजित सभेला प्रतिसाद
साडेचार वर्षात धानाला फक्त २०० रुपयाची वाढ-आ.अग्रवाल
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवर काँग्रेसला विजयी करा-विखे पाटील
फेकु व फसणवीसांची सरकार हद्पार करा-आ.वड्डेटीवार

गोंदिया,दि.११ः-गेल्या साडेचार वर्षापासून राज्यात व केंद्रात जुमलेबाजांची व फसवणुकदारांची सरकार आल्याने राज्यासह देशाची आर्थिक स्थिती ढासळत चालली असून शेतकèयांच्या समस्येत सातत्याने वाढ होत असल्याने जुमलेबाज सरकारला उखडून फेकण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.ते गोंदिया येथे जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्यातील जाहिर सभेत सुभाष मैदानावर आज(दि.११)बोलत होते.पुढे म्हणाले की,राज्यातच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातही पाण्याचा दुष्काळ पडू लागला आहे.गेल्यावर्षी सुध्दा पिण्याची पाण्याची समस्या निर्माण झालेली होती तर आता मार्च महिन्यापर्यंत पुरेल एवढाच जिल्ह्यात पाणी साठा असूनही सरकारला जाग कशी येत नाही अशी टिका केली.दुष्काळाच्या नावावर लोकांची फसवणुक करणाèया सरकारने दुष्काळाचे वेगवेगळ्या प्रकारे चार ते पाच नावाचे नामकरण करण्याशिवाय काहीही केलेले नाही.सत्तेवर येण्यासाठी ज्या जाहिरनाम्यात घोषणा केल्या त्यापैकी एखादी तरी पुर्ण केली हेच सरकारने दाखवावे असेही ते म्हणाले.सोबतच दुतोंडी असलेल्या शिवसेनेला सत्तेशिवाय जमत नाही मात्र विरोधाची नौटंकी करुन भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे सांगत समृध्दी महामार्गाला विरोध करणाèया शिवसेनेला त्या महामार्गाला बाळासाहेबांचे नाव मागण्याची नैतिकताच नसल्याची टिका केली.आम्ही सत्तेवर असताना शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या सरकारवर गुन्हा दाखल करणार का असे सांगत पुर्व विदर्भातील धान उत्पादकांना सरकारने ८०० रुपये बोसन जाहिर करावे अशी मागणी या सभेच्या माध्यमातून केली.
मंचावर येण्यापुर्वी जनसंघर्ष यात्रेतील सर्व मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.त्यानंतर त्यांचा ताफा बाईक रॅलीने कार्यक्रमस्थळी दाखल झाला.मंचावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आमदार व उपगटनेते विजय वड्डेटीवार, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, आमदार गोपालदास अग्रवाल,सुनिल केदार,आशिष देशमुख,आशिष दुआ,आमिर शेख,डॉ.बबनराव तायवाडे,बंडुभाऊ सावरबांधे,सेवक वाघाये,रामरतन राऊत,भरतभाऊ बहेकार,एॅड.के.आर.शेंडे,उषा शहारे,झामसिह बघेले,पी.जी.कटरे,योगेंद्र भगत,अमर वराडे,नामदेवराव किरसान,आलोक मोहंती,संदिप रहागंडाले,सहसराम कोरेटे,रत्नदिप दहिवले,राकेश ठाकूर,शकील मंसुरी,संदिप ठाकुर,प्रफुल अग्रवाल,रमेश अंबुले,लता दोनोडे,जितेंद्र कटरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

जनसंघर्ष यात्रेदरम्यान बोलतांना विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे पोटनिवडणुकीत आपण विजय मिळवून दिला त्याचप्रमाणे २०१९ च्या निवडणुकीत भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघातून काँगे्रसचा खासदार निवडून पुर्नरावृत्ती करावी असे आवाहन केले.सोबतच कांँग्रेसने जय जवान जय किसानचा नारा देत देश स्वंयपुर्ण करून हरितक्रांती देशात घडविली.याउलट चार वर्षात सत्ताधारी भाजप शिवसेनासरकारने वाट लावल्यामुळे शेतकरीराजा संकटात सापडल्याची टिका केली.विदेशातील काळा पैसा आणणारे व नोटबंदीतून काळा पैसा बाहेर काढणाèया भाजप नेत्यांचाच काळा पैसा पांढरा झाल्याचे सांगत राहुल गांधीच्या नेतृत्वात राफेलवर काँग्रेस जनआंदोलन करुन सत्ताधारी सरकारने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणत असल्यानेच सरकार व्देषभावनेने वागत असल्याचे सांगत राफेलच्या मुद्यावर संयुक्त संसदीय समितीची चौकशी न बसविणे हेच भ्रष्टाचार असल्याचा सबळ पुरावा असल्याचे सांगत ६०० कोटीचा विमान १६०० कोटीला घेण्याची गरज का पडली अशा प्रश्न उपस्थित केला.तर सत्तेसाठी हे रामाच्या नावाचा वापर करीत असून आता हनुमानाच्या जातीवरुनही यांनी देशात अराजकता माजविल्याची टिका केली.सोबतच २५ वर्षापुर्वी रथयात्रा घेऊन निघालेल्या अडवाणीजींना व त्याच्या पक्षाला त्यावेळी गोळा केलेल्या विटा कुठे आहेत का नाही बांधले मंदीर हा प्रश्न विचारण्याची गरज असून सध्याचे सरकार फक्त सत्तेसाठीच राममंदिराचा वापर करीत असल्याचे पाटील म्हणाले.कर्जमाफीपासून शेतकरीच नव्हे तर भाजपचा नाशिक येथील आमदारही त्रस्त असल्याचे पाटील म्हणाले.माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शेजारील राज्य जर कर्जमाफी करुन शेतकरीवर्गाला न्याय देत असेल व धानाला २५०० चा भाव देत असेल तर राज्यातील सरकारला का देता येत नाही असे बोलत त्यांनी ही सरकारच फसवी असल्याची टिका केली.
आमदार विजय वड्डेटीवार यांनी पांढरा दाडीचा माणूस टिव्हीवर यायचा आणि मनमोहक लुभावन्या गोष्टी करायचा.६० वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही म्हणणारे प्रधानमंत्री व भाजपचे नेते ज्या शाळेत शिकले,ज्या रुग्णालयात जन्माला आले ते व त्यांचे वाहन ज्या रस्त्यावरुन जातात आणि ते ज्या विमानाने प्रवास करतात यासह संगणक क्रांती ही काँग्रेसच्याच काळात आल्यामुळेच दिसून येते हे मात्र विसरले असून फक्त खोट्या व फसव्या घोषणा करुन सरकार चालवणारे फेकू व महाराष्ट्रातील फसणवीस यांनी जनतेवर सातत्याने अन्याय केला आहे.त्यामुळे देशातून व राज्यातून फेकू व फसणवीसांचे सरकार हद्दपार करण्यासाठी आपण सर्व सज्ज राहा असे आवाहन करीत धानाला २५०० रुपये भाव देण्यासाठी राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार आणण्याचे आवाहन करीत गावपातळीपासून उर्मट शिक्षणमंत्र्याच्या विरोधात निषेध नोंदविण्याची गरज व्यक्त केली. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी देशातील व राज्यातील गद्दाराची सरकार बदलने गरजेचे झाले असून ही सरकारच शेतकरी विरोधी असल्याची टिका केली.काँग्रेसच्या काळात शेतकèयांच्या धानाला जे भाव मिळाले ते भाजपच्या काळात मिळाले नसून गेल्या साडेचार वर्षात फक्त २०० रुपयाची वाढ धानावर झाल्याची टिका केली.तर पुर्व विदर्भात जलयुक्तच्या नावावर सरकार भ्रष्टाचार करीत असून या भागातील परिस्थिती बघून योजनेचे निकष नसल्याने ही सरकार या योजनेतून भ्रष्टाचार करीत असल्याची टिका केली. यावेळी उपस्थितांनीही विचार व्यक्त केले.प्रास्तविक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांनी केले तर संचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले.