स्वप्नपूर्ती फाऊंडेशनच्या चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

0
17
लाखनी,दि.12ः- स्वामी विवेकानंद जयंती युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि विवेकानंद सार्वजनिक वाचनालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, लाखनी येथे आयोजित करण्यात आले होते.
अ गटात लहान मुले ते इयत्ता ६ वी पर्यन्तचे विद्यार्थी राहतील तर  ब गटात इयत्ता ७ वी पासून इतर सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. यात ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची सुरुवात विवेकानंद आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका संध्या हेमणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी आदर्श माता राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराजांचे गडकील्ले, शिकागो धर्मपरिषदेतील एक क्षण, शाळा, शिवाजी महाराजांची तलवार, माझ्या स्वप्नातील भारत असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेला गझलकार प्रल्हाद सोनवणे, डॉ चंद्रकांत निंबार्ते, ऍड कोमलदादा गभणे, संदीप भांडारकर, मुख्याध्यापिका संध्या हेमणे, गोवर्धन शेंडे, लोकेश भुते, नितेश टिचकुले, बाबुराव निखाडे यांनी भेटी दिल्या. यावेळी प्रशांत वाघाये, अजिंक्य भांडारकर, आशिष बडगे, बाबुरावजी निखाडे, हेतलाल पटले, अक्षय मासुरकर, आशिष राऊत यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.