समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नाव द्यावे; संभाजी राजेंची मागणी

0
40

बुलढाणा-,दि.13(विशेष प्रतिनिधी) – मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आज जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त सिंदखेड राजाया येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना संभाजी राजे यांनी ही मागणी केली. मुंबई आणि नागपूरला जोडणारा 800 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग हा जिजाऊंच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.

शाहू, फुले, आंबेडकरांनी एकजूट केलेला बहुजन समाज तोडण्याचे कारस्थान सध्या राज्यात देशात युद्धपातळीवर सुरू आहे. हे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बहुजन चळवळ बळकट करावी, असे प्रतिपादन खा छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी शिवधर्म पीठावर केले. शनिवारी १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाउंच्या ४२१ व्या जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ सृष्टीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आज सिंदखेड राजा येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्यावतीने १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ माँसाहेबांची महापूजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर १२ जानेवारी रोजी सूर्योदयापासूनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून माँ जिजाऊचरणी लीन होऊन माँ साहेब जिजांऊचे आशीर्वाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता.
प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, खासदार सुप्रियाताई सुळे, डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, कमलेश जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई पाटील, मराठा सेवा संघाचे तेलंगणा अध्यक्ष आनंदराव जाधव, प्रफुल्ल तावरे शर्मिला पाटील, खा. प्रतापराव जाधव, राजेश लोखंडे, राजेश साळके, छत्तीसगड, गंगाधर पनवरे, सौरभ खेडेकर, अर्जुन तनपुरे, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, मधुकर चौधरी, मनोज आखरे, पुरुषोत्तम कडू, लेप्टनन कर्णल राजेंद्र निंबोरकर, प्रदीप पाटील, प्रकाश पोहरे, रविकांत तुपकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, आ. राहुल बोंद्रे, दिलीप कुमार सानंदा, डॉ. लता भोसले बाहेकर, मधुकर मेहेकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी कु. तेजस्वी देशमुख हिने जिजाऊ वंदना सादर केली. त्यानंतर आपल्या प्रास्ताविकात राजेश लोखंडे यांनी १४ हजार कोटी रुपयांच्या कामात जिजाऊ भक्तांनी हातभार लावावा, असे आवाहन केले.
दरम्यान, राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अभिनेते आणि शिवसेना नेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ”आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करा. प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या, तर शिवबा जन्माला येईल. प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज आहे.”

फसवणूक सरकारकडून सिंदखेडराजाचीही फसवणूक- सुप्रिया सुळे

बुलढाणा- फसवणूक सरकारकडून सिंदखेडराजाचीही फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे.राज्यात फसवणूक सरकारने जनतेची संपूर्णपणे दिशाभूल करुण फसवणूक केली आहे. तसेच, सिंदखेराजा विकास आराखड्याविषयी बोलताना मूख्यमंत्र्यांनी येऊन घोषणा केली होती की, 350 कोटी रुपयांचा हा विकास आराखडा आहे तो पूर्णत्वाकडे नेण्यास सरकार कटीबद्ध राहिल असे आश्वासन दिले होते मात्र त्यांनी फक्त फसवणूकच केली आहे.आमचे सरकार जेव्हा सत्तेत येईल तेव्हाच जिजाऊ जन्म सिंदखेडराजाचा विकास आराखडा पूर्ण होईल, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे जिजाऊ भक्तांची प्रचंड गर्दी झाली असून जिजाऊच्या दर्शनासाठी देशभरातील जिजाऊ भक्त लाखोच्या समुदाय जमला आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सुळे यांनी सिंदखेडराजा राजवाड़ा येथे येऊन जिजाऊचे दर्शन घेतले त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांना भेटण्याठी युवकांनी प्रचंड गर्दी केली होती.

संभाजी ब्रिगेडचे आघाडीत स्वागतच- खा अशोक चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपत काँग्रेस काम करते. आपले सरकार आले तर जिजाऊ जन्मभूमीचा आणि या परिसरात विकास करण्याची ग्वाही दिली. सर्जिकल स्ट्राईकचे प्रमुख मंचावर असले तरी येत्या काळात खऱ्या अर्थाने जनताच सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचे सांगितले. संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष असून समविचारी पक्षानि एकत्र आले पाहिजे, म्हणून ते काँगेस सोबत आल्यास त्यांचे स्वागत असल्याची भूमिका सांगितली. मराठा सेवा संघाने लोकशिक्षनांतून खरा इतिहास समोर आणल्याचे देखील यावेळी सांगितले.
 माँ जिजाऊंनी नैतिक अधिष्ठान दिले- डॉ अमोल कोल्हे
मराठा विश्वभूषण पुरस्कार आपण संपूर्ण टीमच्या वतीने नम्रपणे स्वीकारत असल्याचे सांगून जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले पण जिजाऊ, शिवराय, संभाजी महाराज यांचे नाव घेताना मान आदराने झुकते. जिजाऊ म्हणजे त्याग, अखंड प्रेरणा आणि आदर्शाची वाट आहेत असे सांगितले. नीतिमत्ता, संस्कार व नैतिक अधिष्टांन जिजाऊ मुळे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला मिळाल्याचे ते म्हणाले. अमोल कोल्हे हे आजच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. सोबतच स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा चे चित्रण रायगडावर करण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. शिवाय मनात शिव विचारांचा भगवा फडकत ठेवा असे आवाहन तरुणाईला केले