रासेयो शिबिरे ही व्यक्तिमत्त्व विकासाची दालने-आमदार सोले

0
19

सिंदेवाही,दि.13ः- तालुक्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालयात राज्यस्तरीय रासेयो शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल सोले यांच्या हस्ते पार पडले.त्यावेळी बोलतांना आजच्या तरुण पिढीला समाजाभिमुख करण्यासाठी आणि चारित्र्य संपन्न बनविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराशिवाय पर्याय नाही असे मत आ.सोले यांनी व्यक्त केले ते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 8  ते 14 जानेवारी 2019 या कालावधीत संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय रासेयो शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चंद्रशेखर भुसारी होते त्यांनी रासेयो या संस्कारपीठाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख अतिथी म्हणून गो. ना. मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे,गोंडवाना विद्यापीठ रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी तसेच भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य सदानंद बोरकर,श्री ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाकरे उपस्थित होते. या राज्यस्तरीय शिबिरात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील शिबिरार्थी सात दिवस निवासी राहणार आहेत श्रमदान, व्यक्तिमत्व विकास पर्यावरण, स्वच्छता, व्यसनाधीनता आदी विषयावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती वर्षाच्या निमित्ताने आयोजित या राज्यस्तरीय शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ अरमरकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.