जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ’18 वे जिल्हास्तरीय शैक्षणिक संम्मेलन उत्साहात

0
11

गोंदिया,दि.13:–गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व गोदिया तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने  12जानेवारीला जिल्हास्तरीय शैक्षणिक संम्मेलनाचे आयोजन स्व.शोभादेवी विद्यालय व मयुर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय टेमणी(गोंदिया) येथे करण्यात आले होते.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते.तर उद्घाटन खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते झाले.स्वागताध्यक्ष म्हणून माॅ रेणुका बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदियाचे सचिव श्यामभाऊ चंदनकर हे उपस्थित होते.विशेष अतिथी गोंदिया बॅकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले ,राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोतराव खेडीकर ,राज्य सदस्य नरेन्द्र वाळके,विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर,विदर्भ सचिव सतिश जगताप,विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी,विदर्भ कोषाध्यक्ष राजकुमार बालपांडे,विदर्भ संघटन सचिव अनिल बाळसराप,नागपुर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री माटे,विदर्भ मुख्याध्यापक संघाचे विलास बारसागडे,विदर्भ उपाध्यक्ष रामसागर धावडे, जि.प.सदस्या खुशबुताई टेंभरे,टेमणी ग्राम पंचायत च्या सरपंच खेलनताई टेकाम,उपसरपंच शिवलाल नेवारे,विदर्भ महिला प्रतिनीधी कु.रजिया बेग,विदर्भ प्रतिनीधी महेन्द्र मेश्राम,गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रमेश तणवानी,कार्यवाह बी.डब्लु कटरे,माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक यशवंत परशुरामकर,माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक प्रकाश पटेल,माजी कार्यवाह तथा मार्गदर्शक खुशाल कटरे,से.नि.प्राचार्य जी.टी.भोयर विचार मंचावर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील सेवानिवृत मुख्याध्यापकांचा सेवानिवृतीपर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी राज्य,विदर्भ,जिल्हा स्तरीय मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांचे कोणते प्रश्न निकाली काढले,कोणत्या समस्यांवर संघर्ष सुरू आहे आदीचा अहवाल प्रास्तविकाच्या माध्यमातून सादर केला.सातव्या वेतन आयोगात काय साध्य झालं?या बाबतीतील संपुर्ण विवेचन श्री वाळके यांनी केले.गोंदिया जिल्हा बॅके कडून कर्मचार्यांचा पगार त्यांच्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करुन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेस करण्यात कोणतीच अडचन येणार नाही अशी हमी बॅक उपाध्यक्ष राधेलाल पटले यांनी दिली .
या प्रसंगी एकुन 26 शैक्षणिक समस्यांचे ठराव सर्वानुमते मंजुर करून शिक्षण खाते व महाराष्ट्र शासन यांच्याकडे राज्य मुख्यासंघाचे अध्यक्ष मारोतराव खेडीकर तथा विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांच्या मार्फत देण्यात आले.आभार जिल्हा अध्यक्ष रमेश तणवाणी यांनी मानले.संचालन जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे,भगिरथ जिवाणी,डी.एम.राऊत,यांनी केले.संचालना साठी सहयोग जिल्हा कोषाध्यक्ष भुपेन्द्र त्रिपाठी यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोंदिया तालुका मुख्याध्यापक संघा स. जिल्हा कार्यकारीणीने परीश्रम घेतले.