दुष्काळ अभावी राज्यातील पहिली चारा छावणी म्हसवड मध्ये सुरु

0
44

मुंबई / म्हसवड. ( शाहरुख मुलाणी, महेश कांबळे ),दि.13 – जनावरांना चारा कुठेच उपलब्ध होत नसल्याने राज्य शासनाने गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर केले असताना सुद्धा प्रशासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते. अशात शेतकऱ्यांनी जनावरांची देखभाल कशी करायची म्हणून खाजगी स्वरूपात सन २०१८ – १९ मधील जानेवारी महिना सुरु होताच राज्यातील पहिली चारा छावणी नेहमीच सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील माणदेशी फाउंडेशनने बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड शहरातील मेघासिटी येथे सुरु करण्यात आली आहे.

सातारा माण मधील म्हसवड हे नगर नेहमीच दुष्काळावर चर्चित राहिलेले गाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात वर्षातील सर्वात कमी पाऊसाची नोंद देखील इथेच होत असते. नेहमीच सामाजीक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील माणदेशी फाउंडेशनने बजाज फाऊंडेशनच्या सहकार्याने म्हसवड शहरातील मेघासिटी येथे सुरु केलेल्या जनावरांच्या एकमेव चारा छावणीत आठवडाभरातच साडे ५ हजाराहुन अधिक जनावरे दाखल झाली असल्याने याठिकाणी यात्रेचे स्वरुप आले असुन जनावरांच्या देखभालीसाठी चारा छावणीतच रहात असलेल्या शेकडो शेतकऱ्यांची  देखभाल आता फाऊंडेशनच्या माध्यमातुन केली जात आहे, त्यांना पिण्याचे पाणी व थंडीपासुन बचाव करण्यासाठी गरमा गरम ब्लँकेट देण्याबरोबरच त्यांच्यासाठी अल्प दरात वैद्यकिय सेवा ही उपलब्ध करुन दिली असल्याने आता छावणीच आपले घर बनले असल्याच्या अनेक प्रतिक्रिया हजारो शेतकऱ्यांतून येत आहेत.

माण तालुक्यात पडत असलेल्या गंभीर दुष्काळाचा सामना करण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच सज्ज असतो, यंदाही तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ पडला असल्याने जनावरांना चारण्यासाठी जवळपास चारा कोठेच उपलब्ध नाही त्यामुळे दावणीवरच जनावरांचा हंबरडा सुरु आहे. चाऱ्याअभावी जनावरांची होत असलेली तडफड पाहुन बळीराजाच्या डोळ्यात रोज अश्रु उभे राहत आहेत. जनावरांची ही तडफड पाहुन बळीराजाचे अश्रु पुसण्यासाठी सर्वप्रथम एक पाऊल पुढे टाकत येथील माणदेशी फाउंडेशनने जनावरांसाठी चारा छावणी सुरु करण्याचा निश्चय केला त्याला बजाज फाऊंडेशन ने सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. अन नवीन वर्षाचा सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी पासुनच येथील मेघासिटी येथे सुरु झाली जनावरांची चारा छावणी, ही चारा छावणी राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी ठरली आहे. अद्यापही शासनाकडुन चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय जाहीर नसल्याने माणदेशीने सुरु केलेल्या या चारा छावणी आठवडाभरातच सुमारे ५ हजारांहुन अधिक जनावरे घेवुन शेकडो शेतकरी दाखल झाले आहेत. तालुक्यात एकही जनावरांची चारा छावणी अद्याप सुरु नसल्याने चाऱ्याअभावी जनावरांची होत असलेली तडफड पाहुन अनेकांनी आपली जिवापाड जपलेली जनावरे ही कसायाच्या स्वाधीन केली. मात्र यापुढे शेतकऱ्यांचे हे पशुधन कोणत्याही परिस्थितीत कसाबाकडे जावु नये यासाठी माणदेशी ने घेतलेला हा धाडसी निर्णय शेतकऱ्यांकडेसह जनावरांसाठी वरदान ठरलेला आहे. अवघ्या आठवडाभरातच ५ हजाराचा टप्पा ओलंडलेल्या सदरच्या या चारा छावणीत जनावरांसाठी दररोज ऊस, मका, पेंड, सरकी आदी खाद्य दिले जात आहे, तर जनावरांसोबत छावणीतच राहणाऱ्या शेतकऱ्यांचा थंडीपासुन बचाव व्हावा यासाठी त्यांना गरमा गरम ब्लँकेट दिली जात आहेत, दिवसभर कडक असे ऊन पडत असल्याने ऊन्हापासुन जनावरांना त्रास होवु नये याकरीता नुकतेच फाऊंडेशनच्या वतीने ग्रीन शेड नेटचे ही वाटप करण्यात आले आहे. तर जनावरांना कोणताही संसर्ग आजार होवु नये यासाठी फाऊंडेशनच्या वतीने खाजगी डॉक्टरांची एक टिम तैनात ठेवण्यात आले आहे. जनावरांच्या देखभालीसाठी छावणीतच राहणाऱ्या शेतकऱ्यांचेही आरोग्य निरोगी रहावे यासाठी फाऊंडेशनच्या वतीने त्याठिकाणी अत्यल्प दरात वैद्यकिय सेवा सुरु केली आहे. त्यामुळे जनावरांच्याच आशीर्वादामुळे आपलेही येथील आरोग्य निरोगी रहात असल्याची भावना छावणीतील असंख्य शेतकऱ्यांची बनली आहे.