मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

ट्रकवर आदळली पोलिसांची कार, अपघातात ४ ठार

बुलढाणा,दि.14 : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ५.३० वाजेदरम्यान घडली. जखमीमध्ये इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनच्या पिएसआयसह ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नांदुरा ते मलकापूर रोडवरील काटी फाट्याजवळ ही घटना घडली.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. महामार्गाचे काम थांबले असल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे अजूनही कायम आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचण निर्माण झाली आहे. सोमवारी पहाटे इंदौरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक व काही कर्मचारी अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीस व त्याच्या नातेवाईकांना घेवून सिंगरोलकडे जात होते. दरम्यान त्यांची कार नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली. कारचा वेग जास्त असल्याने ही कार मागून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली. अपघातात पोलिसांच्या कारमधील ४ जण ठार झाले असून तिघे जखमी झाले आहेत. या कारमधील भाविक इंदौर येथील रहीवाशी असून तीघे मित्र गुरुद्वारा येथून दर्शन आटोपून घराकडे निघाले होते. अपघातातील जखमींना प्रथम वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मलकापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share