संत चोखामेळा पुरस्कार ख्यातनाम युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना जाहीर – सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

0
20

गोंदिया  14: – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
महाराष्ट्र शासन, यांच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समता प्रतिष्ठान नागपुर यांच्या वतिने सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान
करणारे, कीर्तनाच्या, प्रबोधनाच्या व गीतांच्या माध्यमातून समाजात
महापुरुषांचे संत महात्म्यांचे विचार पोहचविण्याकरिता प्रबोधन करणाऱ्या
कलाकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या वतीने मागील
वर्षापासून संत चोखामेळा पुरस्कार देण्यात येतो. दिनांक 14 जानेवारी संत
चोखामेळा यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदाचा संत चोखामेळा साहित्य
पुरस्कार महाराष्ट्रातील ख्यातनाम, सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक, युवा
प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना देण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाचे मंत्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष
राजकुमार बडोले यांनी नागपुरात घोषणाकेली.
तुषार सूर्यवंशी यांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच
आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, पंजाब इत्यादि राज्यामध्ये संविधान
जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान आदर्श गाँव, तंटामुक्ती अभियान
व्यसनमुक्ती, निर्मल गाँव, शिक्षण, आरोग्य, बालसंस्कार शासनाच्या
जनकल्याणकारी योजना, परिवर्तनवादी विचारनेत्रदान-देहदान-रक्तदान इत्यादि
विषयामधून फुले-शाहू-आंबेडकर, संत गाडगे बाबा, सत चोखामेळा संत तुकडोजी
महाराज संत कबीर अन्नाभाऊ साठे संत रविदास इत्यादि संत महापुरुषांचे
परिवर्तनवादी विचार समाजातील तळागळा पर्यंत प्रबोधणाच्या माध्यमातून
पोहचविण्याचे कार्य केले आहे तुषार सूर्यवंशी यांचे संपूर्ण भारतात 1800
पेक्षा अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. आता पर्यंत तुषार सूर्यवंशी यांना
विदर्भ गौरव पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा
व्यसनमुक्ती पुरस्कार समाजप्रबोधन पुरस्कार नागपुर भूषण पुरस्कार युवा
कलारत्न पुरस्कार फुले-शाहू -आंबेडकर समता पुरस्कार असे विविध 45  पेक्षा
अधिक पुरस्कार त्यांना
मिळाले आहेत. अनेक शाळा महाविद्यालये अनाथालय वृद्धाश्रम, कारागृहे
इत्यादि ठिकाणी कार्यक्रम सादर केलेत तसेच अनेक टीव्ही चैनेल झी टीव्ही,
IBN लोकमत, सह्यान्दी, आकाशवाणी, लॉर्ड बुद्धा टीव्ही, आवाज इंडिया
टीव्ही इत्यादि चैनेल च्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केले आहे.  या
संपूर्ण कार्याची व प्रबोधनाची दखल घेत यंदाचा दूसरा संत चोखामेळा
साहित्य पुरस्कार तुषार सूर्यवंशी यांना प्रदान येत आहे.  सदर
पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे
असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना.राजकुमार बडोले
यांनी केले.