मुख्य बातम्या:

विधान परिषदेचे माजी सभापती व ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. महिन्याभरापासून बॉम्बे रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
विधान परिषदेचे सभापती असताना सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांचा संघर्ष निर्माण झाल्यास संयमाने हाताळण्याची कसरत शिवाजीराव देशमुख यांनी लीलया पेलली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना काँग्रेसला ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. उद्या सांगली जिल्ह्यातील कोकरुड या मुळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी सांगली जिल्ह्यात झाला होता. देशमुख हे १९९६ ते २००२ या कार्यकाळात त्यांनी विधानपरिषदेचे सभापतीपद भूषवलं. त्याआधी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेस पक्षाला सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लाभत होतं. काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. 1987मध्ये आमदार असल्यापासून आम्ही त्यांना पाहतोय. त्यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे, काँग्रेसचे मार्गदर्शक हरवल्याची भावना काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
Share