मुख्य बातम्या:

माजी आमदार आत्रामाची श्री रंगनाथस्वामी कल्याण महोत्सवाला भेट

सिरोंचा,दि.14ः-येथील पुरातन व प्राचीन अतिपवित्र बालाजी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माता गोदादेवी व श्री रंगनाथस्वामी यांची कल्याण महित्सव सोहळा आज मोठ्या थाटात व उत्साहात पार पडला.या कल्याण महोत्सव उत्सवाला आज अहेरीचे माजी आमदार व आविस नेते दीपक दादा आत्राम यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी महोत्सवासाठी आर्थिक मदत दिली.
यावेळी माजी आमदार दिपक आत्राम यांच्या समवेत गडचिरोली जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगाम, अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके,पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे, गरकापेठा सरपंच विजया आसाम,पं. स. माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविस जेष्ठ नेते मंदा शंकर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ताल्ला वेंकना ,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम,आविस सल्लागार रवी सल्लम, भामरागड आविस तालुका अध्यक्ष सुधाकर तिम्मा, सुधाकर पेद्दी, श्याम बेज्जनीवार, मारोती गणापूरपू, रवी बॉंगोनी, प्रसाद कसेट्टी, जाफराबाद सरपंच बापू सडमेक, उपसरपंच तिरुपती दुर्गम, संतोष पडाला, श्रीनिवास कोंमुला,मलेश बट्टी ,सारली दुर्गम, वासू सपाट, तिरुपती बिरेली,रवी सुल्तान, आदी आविस पदाधिकारी व कार्यकर्तागण उपस्थित होते.

Share