प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच गठीत 

0
10
गोंदिया,दि.17ः-गोंदिया- भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे सर्व शासकीय कार्यालय, स्वंयसेवी संस्था, महामंडळे, तसेच अन्य संस्थांमध्ये मतदार जागृती मंच (Voters Awareness Forums) स्थापन करुन एक नोडल अधिकारी नियुक्त करणे बाबत निर्देश प्राप्त असून जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 16 जानेवारी 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत उपस्थितांना त्यांच्या कार्यालयांतर्गत मतदार जागृती मंच गठीत करुन एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
             जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हयातील प्रत्येक शासकीय कार्यालयात  मतदार जागृती मंचाचे गठन करण्यात आले असून प्रत्येक कार्यालयात बैठक आयोजित करुन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदार जागृतीमंचाचे उदिष्ट पटवून देण्यात आले. तसेच नोडल अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीत मतदार जागृती मंच अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही या बाबत निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर जावून खात्री करण्याचे निर्देश दिले तसेच मतदारांना आपले नाव मतदार यादीत नसल्यास नमुना -6 भरुन जवळच्या तहसिल कार्यालयात किंवा संबंधित बी.एल.ओ कडे जमा करावे अथव www.nvsp.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करण्याचे आवाहन केले.
पोलिस मुख्याल कारंजा येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम
आगामी लोकसभा विवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ करुन सर्व घटकांना समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भात मतदारांच्या मनात येणाऱ्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक विभाग कडुन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच निवडणूक प्रकियेत मतदारांचे सहभाग नोंदविण्यासाठी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे. मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा पोलिस मुख्यालय कारंजा येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मतदान प्रात्याक्षीक कार्यक्रम राबविण्यात आले. या ठिकाणी 84 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमवर प्रत्यक्ष मतदान केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व माहिती जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख बी.डी. भेंडारकर यांनी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे प्रात्याक्षीक दाखवून मतदान प्रकियेची कार्यप्रणाली सांगण्यात आली. कार्यक्रमात प्रामुख्याने पोलिस निरिक्षक गोठेकर पोलिस उपनिरिक्षक पी.बी. ओड, एन. के. वाघ व अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.