प्रफुल्ल अग्रवाल यांच्या हस्ते दिव्यांगाला तीनचाकी रिक्षा भेट

0
7

गोंदिया,दि.17 : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते मेहबुबभाई व कदीरभाई यांनी अयान खान यांची भेट घेऊन गोंदिया-भंडारा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल यांना तीनचाकी रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अयान खान यांना प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तीनचाकी रिक्षा भेट देण्यात आला. यावेळी प्रफुल्ल अग्रवाल म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हे समाजाचा भाग असून सर्वांनी दिव्यांगांची मदत करणे गरजेचे आहे. यावेळी व्यंकट पाथरू, आवेश पोठियावाला, सरफराज गोडील, मेहबुब अली, शाहीभाई, हाजी सैय्यद शमर अली, रसिकभाई कुरैशी, हयादखान, अहमद अली, शाहिर अली, हाजी तवक्कल शाहा, शहीदभाई, जावेदभाई उपस्थित होते..