नाना पटोलेंचा शेतकºयांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांना घेराव

0
9

भंडारा,दि.17 : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकिला आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर घेराव घालत जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर आज गुरुवारी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेतकरी शेतमजूर आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात आला.नियोजन समितीची बैठक सुरु असतानाच सभागृहाच्या प्रवेशद्वारावर पटोले कार्यकर्त्यांसह पोचून  ठिय्या आंदोलनास सुरवात केली.त्यानंतर पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांनी पटोले यांच्याशी चर्चा करुन पालकमंत्री व ऊर्जामंत्री बावनकुळे यांना निरोप दिल्यानंतर पालकमंत्र्यानी सभागृहाबाहेर येऊन पटोलेंसोबत मागण्यावर चर्चा केली.यादरम्यान पटोले समर्थकांनी त्यांच्या समर्थनात घोषणा दिल्या तर दुसरीकडे बावनकुळेंच्या समर्थनातही घोषणा झाल्या.चर्चा सुरु असतानाच बावनकुळे यांनी उभे होऊन कुणीही घोषणा देणार नाही अशा दम भरत पुन्हा चर्चेला सुरवात केली मात्र पटोलेंचे समर्थक पटोलेंचेही न एैकता त्यांच्या जयघोषाच्याच घोषणा करीत होते.त्याचवेळी एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजपबद्दल अपशब्द वापरल्याने तणाव निर्माण होत हाणामारीपर्यंत हे प्रकरण पोचले.

पटोले आणि बावनकुळेंच्या चर्चेनंतर जिल्हा परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि घोषणाबाजी सुरुच राहिल्याने पोलिसांनी लाठ्याघेऊन उपस्थितांना हाकलून लावण्याचे काम केले त्यातच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या वाहनापर्यंत पोलिसांचा जमाव गेला आणि त्याठिकाणी पत्रकारांनाही मज्जाव करीत बाहेर निघण्यास सांगितले मात्र काही पत्रकार आम्ही प्रेसवाले आहोत हे सांगत मोबाईलवर चित्रिकरणातच व्यस्त दिसून येत होते.पोलीस मात्र लाठीचार्च करण्याचे माईकवरुन घोषणा सातत्याने करीत जमावाला पांगविण्याचे प्रयत्न करीत होते.

जिल्ह्यातील धानउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना घेऊन नाना पटोले यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या चारही बाजूंनी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पटोलेंनी भिंतीवरून उडी घेऊन जिल्हा परिषद परिसरात प्रवेश केला व थेट पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात जाब विचारला. पालकमंत्र्यांनी त्यांची समजूत काढीत मागण्यांसंदर्भात चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतरही पटोलेंनी शेतकरी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभागृहासमोरच ठिय्या मांडला.
सभेनंतर पालकमंत्री बावनकुळे यांनी नाना पटोलेंच्या आंदोलनाला भेट देत मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी खरेदी केंद्रावर मागील तीन महिन्यांपासून धान पडून असून खरेदी करण्यात आली नाही. धानाचे चुकारे अडलेले आहेत. 16 तास वीजपुरवठा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सहा तास वीजपुरवठा सुरू राहत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मागील पाच महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना मजुरी मिळाली नाही व विविध मागण्यांवर चर्चा केली. यासंदर्भात सकारात्मक आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले.