वाशिम जिल्ह्यातील गायवळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

0
17

अमरावती, दि. १८ : : वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस दि. 21 ऑग्स्ट 2008 च्या अन्वये सहा कोटी बत्तीस लाख रुपये इतक्या किंमतीस (दरसूची 2007-08 वर आधारीत) मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.या प्रकल्पास 6 जून 2015 अन्वये बारा कोटी दहा लक्ष रुपये इतक्या किंमतीस (दरसूची 2009-10 वर आधारीत) प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

बांधकामाचे दरम्यान योजनेच्या खर्चात दरसूचीतील बदलामुळे झालेली वाढ, जास्त दराच्या निविदा स्विकृतीमुळे वाढ, भुसंपादन खर्चातील वाढ, संकल्पनातील बदल,इतर कारणे व अनुषंगिक खर्च इत्यादी कारणामुळे वाढ झाली असून योजनेची अद्यावत किंमत प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता किंतीच्या दहा टक्क्याहून अधिक वाढ असल्यामुळे व सदर प्रकल्प मा. राज्यपाल महोदयांच्या सिंचन अनुशेष निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत असल्याने द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणे आवश्यक होते.

उपरोक्त बाबीनुसार पुढीलप्रमाणे विदर्भ पाटबंधारे विभागाव्दारे निर्णय देण्यात आला आहे- वाशिम जिल्ह्यातील गायवळ (सं) लघु पाटबंधारे योजना, ता. कारंजा जि. वाशिम या योजनेच्या एकूण अंदाजित खर्च      26 कोटी 94 लक्ष 10 हजार रुपये किंमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.  त्यापैकी 25 कोटी 79 लक्ष 30 हजार रुपये फक्त कामाप्रित्यर्थ आणि 1 कोटी 14 लक्ष 80 हजार रुपये अनुषंगिक खर्च आहे. अंदाजपत्रकात उर्वरीत कामांसाठी जलसंपदा विभागाची सन 2016-17 या वर्षांच्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहेत. उपशिर्षावर तरतुदींचा गोषवारा परिशिष्ट-1 मध्ये संलग्न आहे.

ठळक बाबी- योजनेचे सिंचन क्षेत्र-337, योजनेमुळे एकूण होणारा पाणीसाठा-2.03 द.ल.घ.मी (2030 स.घ.मी, प्रति स.घ.मी. पाणीसाठा किंमत रु. 132000 मापदंड रु 95790 x90%= 86211/- प्रती स.घ.मी प्रकल्प मापदंडात बसत नाही. योजनेचे लाभव्यय गुणोत्तर- 0.52 मापदंड 1.00 पेक्षा जास्त प्रकल्प मापदंडात बसत नाही.हा निर्णय संदर्भीय निर्णयातील परिच्छेद 1.3 नुसार नियामक मंडळाचे दि. 4-10-2018 रोजी संपन्न 71 व्या बैठकीतील मान्य झालेल्या ठराव क्र.71/5 चे अनुषंगाने मा. सचिव उपसमितीने रातांसस,नाशिक यांचे छाननी अहवालातील मुद्या क्र. 26 व 27 च्या पूर्ततेच्या अटीसह महामंडळास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात आले आहे.

या योजनेच्या कामावरील खर्च मागणी क्र. आय-5 मुख्य लेखाशिर्ष 4702 लघु पाटबंधारे यावरील भांडवली खर्च (80)-सर्वसाधारण,(190)-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका (00) (05), विदर्भ पाटबंधारे महामंडळ भाग भांडवली अंशदान (4702 510-1) या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

या योजनेस प्रदार केलेली द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता (1/2019) या अनुक्रमांकावर नोंदवण्यिात आली आहे. सदर प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची दक्षता क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी घ्यावी.सदर निर्णय जलसंपदा विभागाचे wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे Mini Web Portal वर उपलब्ध करण्यात आला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष विकास महामंडळाचे अध्यक्ष यांचे आदेशानुसार व नावाने, अधीक्षक अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ , नागपूर यांनी कळविले आहे.