माॅडेल कान्व्हेंटमध्ये रक्त तपासणी शिबिर

0
25

गोरेगाव दि.१९ः:- स्थानीय मॉडेल कॉनव्हेण्ट एण्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव मध्ये मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . या वेळी शाळेचे संस्थपक आर.डी.कटरे,प्राचार्य श्रीमती सी.पी.मेश्राम व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. या मध्ये शाळेतील नर्सरी ते वर्ग 11 वि च्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.तसेच सर्व शिक्षकांनी सुद्धा रक्त तपासणी करून या मोफत रक्त तपासणी शिबिराचा लाभ घेतला, या रक्त तपासणी शिबिराला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्व विध्यार्थी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.