लोधी समाज बांधवांचा एल्गार; संवैधानिक अधिकारासाठी जन आंदोलन

0
44
मोहाड़ी,दि.19 :  गेल्या अनेक वर्षापासून केंद्रामध्ये लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे या मागणीला घेऊन लढा देत असलेल्या लोधी समाजाने आज शनिवारला मोहाडी तहसील कार्यालयावर पायदळ व मोटार सायकल रॅली काढून तहसील कार्यालयासमोर धरणे दिले.
लोधी समाज १६ वर्षापासून आपल्या संवैधानिक अधिकारासाठी झटत आहे. ५ डिसेंबर २०१६ रोजी देशाच्या राजधानीत जंतर-मंतर मैदानावरती राष्ट्रव्यापी आंदोलन केले होते. यामध्ये लाखो लोधी बांधव उपस्थित होते. ५ डिसेंबर २०१७ ला लोधी समाजाचे प्रतिनिधी मंडळाने समाजकल्याण मंत्री यांना भेटून आपल्या मागणीची जाणीव करून दिली होती. महाराष्ट्रात ओबीसीप्रवर्गात मोडत असलेल्या लोधी समाजाला केंदाच्या यादीतही ओबीसीमध्ये समाविष्ठ करण्याच्या मुख्य मागणीचे निवेदन मोहाडी तहसीलदार कातकडे यांच्यामार्फेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री मुंबई यांना पाठविण्यात आले. केंद्राच्या यादीत ओबीसीत मोडत नसल्याने महाराष्टातील सुमारे 48 लाख लोधी समाज बांधवांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यासाठी मराठा आरक्षणाच्या सरकारी घोषणेनंतर लोधी समाजाने तिसऱ्या टप्यात हे आंदोलन आज केले.
मोटारसायकल रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने महिला व पुरुषांचा समावेश होता. लोधी समाजाच्या  आयोजनाखाली जिल्ह्यातील समाजबांधवांसह नागपूर, भंडारा, गोंदिया यवतमाळ  या जिल्यातील प्रतिनिधी मंडळ या आंदोलनात सहभागी होते.देशातील 18 राज्यात लोधी समाज निवास करीत असून 14 राज्यात लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.तर 2 राज्यात लोधी समाज एस.टी.प्रवर्गात आहे. मात्र महाराष्ट व झारखंड या दोन राज्यातील लोधी समाजाला अद्यापही केंद्राच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ठ करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीपुर्वी सरकारने निर्णय न घेतल्यास लोधी समाज राजकारणाला बाजूला ठेवून निवडणुकीवर बहिष्कार करणार असल्याचे मत यावेळी अनेक मान्यवरांनी मांडले.
लोधी समाजाच्या जनआंदोलन घटनास्थळी के के पंचबूद्धे, प्रमोद तीतीरमारे,विजय भुरे, रमेश पारधी, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजच व अन्य पक्षाच्या नेत्यांनी सभा मंडपाला भेट दिली. तहसीलदार कातकडे व पोलीस निरीक्षक कदम यांनी घडनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी लोधी समाज जिल्हा अध्यक्ष धनंजय बिरणवार, सचिव अनंतलाल दमाहे, देवशिंग सव्वालाखे, राजीव ठकरेेले, श्यामसुंदर नागपुरे, चैनलाल मस्करे, पाडुरंग मुटकुरे, हिरालाल नागपुरे, अंकुश दमाहे, हरीचंद बंधाटे, नितीन लिल्हारे, वसंता लिल्हारे, रतनलाल कुंमेरिया, राधेश्याम लिल्हारे, लवकुश बशीने, ध्यानेश्वर दमाहे, प्यारेलाल दमाहे, त्रिसूला दमाहे, राजकुमारी लिल्हारे, भोंदू बशीने, अशोक मुटकुरे, खुशाल नागपुरे, गणेश नागपुरे, संदीप नागपुरे, संतोष महाजन, जगतलाल वटेवार, उदयलाल दमाहे,रुपलाल दमाहे, नारायण ठाकरे, प्रमोद नागपुरे व लोधी समाजच्या महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.