“गुणवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा”-ममता भोयर

0
36

लाखनी,दि.19ः-समाजाने आपल्याला घडवले आहे, आपल्या समाजाप्रती आपले काही देणे लागते म्हणून आपल्या समाजातील लोकांनी समाजकार्यात सहभाग घेतला पाहिजे. वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येतात, मन जुळतात पर्यायाने समाज वृद्धिंगत होतो. याच मेळाव्याच्या निमित्ताने वधुवर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या निमित्ताने होतो हे स्तुत्य आहे म्हणून यासारखे वार्षिक मेळावे आयोजित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कुणबी समाज केंद्रीय संस्था नागपुरच्या उपाध्यक्षा ममता भोयर यांनी केले.त्या कुणबी समाज मंडळ लाखनीद्वारे आयोजित वार्षिक मेळावा, गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भंडारा जि.प.च्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी सौ. मंजूषा ठवकर होत्या. अध्यक्षस्थानी कुणबी समाज केंद्रीय समिती नागपुरच्या उपाध्यक्षा ममता भोयर, तर प्रमुख अतिथी म्हणून लाखनी पं.स. सभापती खुशाल गिदमारे, प्राचार्य परसराम ठाकरे, नागपुर महिला समितीच्या सदस्या सौ. अर्चना निंबार्ते, माजी जि.प.सदस्य राजेश बांते, लाखनी पं.स. चे माजी सभापती अशोक चोले,महिला समिती अध्यक्ष आशा वनवे, युवा समिती अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, अनिल शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सन्माननीय अतिथिंच्या हस्ते तुकाराम महाराज व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.कुणबी समाजातील वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मंडळींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जयकृष्ण फेंडरकर यांनी तर संचालन महिला समिती सहसचिव शालु उरकुडे व आभार प्रदर्शन अंजना पिंपळशेंडे, यांनी केले. कार्यक्रमाला उमराव आठोडे, रामदास सार्वे, माधवराव भोयर, गंगाधर लुटे, परसराम फेंडरकर, मधु मोहतुरे, संजय वनवे, मोहन बोंद्रे, बालू फसाटे, अर्चना ढेंगे, प्रशांत वाघाये, नितेश टिचकुले, मिनाक्षी सिंगणजुडे, तसेच सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.