खामगावात 20 जानेवारीला राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन

0
85

खामगाव दि.19;:-सृष्टी बहुद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी खामगाव येथे तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा कादंबरीकार नवनाथ गोरे हे उपस्थित राहणार असून साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध युवा अभिनेता,लेखक, वक्ते राजकुमार तांगडे
(शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला फेम )यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक (सुरक्षा ) मुंबई  कृष्णप्रकाश व विशेष पोलीस उपमहानिरीक्षक मुंबई, डॉ.बी जी शेखर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ. अॅड. आकाश फुंडकर ( आमदार खामगाव ) व खामगावच्या नगराध्यक्षा सौ. अनिताताई वैभव डवरे उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभाला बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील अकोला येथून प्रा.डॉ.संतोष हुशे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, प्रा. गजानन भारसाकळे, सुप्रसिद्ध हास्यकवि *अॅड अनंत खेळकर, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, राजीव पिसे, प्रा. वंदना दीपक मोरे व प्रशांत सावलकर यांची उपस्थिती राहणार आहे. खामगाव येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, तरूणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेचे अध्यक्ष संतोष इंगळे, संयोजक अरविंद शिंगाडे यांनी ही माहिती दिली.
उद्घाटन समारंभात संमेलनाच्या निमित्ताने शब्दसृष्टी या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच अरविंद शिंगाडे लिखित ‘सूत्रसंचालनाची सूत्रे’ या ई-बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.चंद्रशेखर जोशी सूत्रसंचालन करतील व उमाकांत कांडेकर आभार मानतील.उद्घाटन समारंभा अगोदर ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाचा शुभारंभ होणार असून बुलडाण्याचे उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व नायब तहसीलदार योगेश देशमुख यांचेसह शहरातील शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य – प्राध्यापक, विविध संस्थांचे पदाधिकारी ,साहित्यिक, पत्रकार व विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमी नागरिकांची उपस्थिती राहील.
संमेलनस्थळी विशेष स्मरण म्हणून ज्येष्ठ कवी स्व. भगवान ठग स्मृति बुलढाणा जिल्हा पोस्टर पोएट्री , स्व. सदानंद सिनगारे ग्रंथदालन, स्व.सुभाषराव देशपांडे प्रवेशद्वार करण्यात येणार आहे कोल्हटकर स्मारक मंदिर खामगाव येथील शहीद भगतसिंग साहित्य नगरीमध्ये कर्मयोगी संत गाडगेबाबा विचारपीठावर हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे.
उद्घाटन सत्रानंतर दुसरे सत्र ‘ टॉक शो ‘ चे राहणार असून “तरुणाईच्या सामाजिक जाणिवा विकसनात वाचनाचे महत्त्व”या विषयावर विविधक्षेत्रातील मान्यवरांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्यामध्ये रविकांत तुपकर (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना), रणजित सिंह राजपूत( पत्रकार)किरण सोनार (आयबीएन लोकमत प्रतिनिधी नाशिक) प्रा.डॉ. राजेश मिरगे (वक्ते व लेखक ), मा.सौ पूनमताई पारस्कर (प्रदेश महासचिव जिजाऊ ब्रिगेड ) कु.दीपिका सोनार व कु. दिपाली सुसर यांचा या सत्रात सहभाग राहील. या सत्राचे संवादक म्हणून दिव्य मराठी औरंगाबादचे सचिन कापसे हे राहतील तर दिनेश सातव आभार मानतील.
तिसरे सत्र कविसंमेलनाचे राहणार असून श्री प्रमोद अंबाडकर नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली तर राजू चिमणकर, विशालराजे बोरे रामेश्वर ताठे,सुभाष किन्होळकर, विलास ठोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत किरण डोंगरदिवे, सत्यपालसिंह राजपूत, नितीन वरणकार ,शिवाजी खाडे, प्रा.धम्मरत्न वायवळ,गोपाल खाडे, जावेद शेख , प्रा मंदा नांदुरकर, मधुकर जाधव ,कुशल राऊत ,सुनिल पवार ,ज्ञानोबा तिडके, सुहास जोशी, निलेश देवकर, वैभव भिवरकर सौ वृषाली देवकर, तुषार राऊत , दिनेश गावंडे ,किशोर भागवत , प्रेषित सिद्धभट्टी, अॅड. रजनी बावस्कर , डॉ.मंजुश्री खोब्रागडे , विजय बावस्कर, पुरुषोत्तम चौरे , संदीप गवळी यांचे कविसंमेलन संपन्न होईल.
चौथ्या सत्रात बुलडाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान तरुणांना युथ आयकॉन अवार्ड प्रदान केले जातील.मा. खासदार प्रतापराव जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला बुलढाण्याचे आमदार मा हर्षवर्धन सपकाळ, खामगाव चे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, मूर्तिजापूरचे माजी आमदार व चित्रपट अभिनेते प्रा तुकाराम बिडकर तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांच्या विशेष उपस्थितीत ‘नाळ ‘ चित्रपटातील कलाकार अॅड. गणेश देशमुख यांचेसह खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष मा. आशिष चौबिसा, शिंगणे महाविद्यालयाचे सचिव डॉ.सद्गुणराव देशमुख, खामगाव न. प सदस्य देवेंद्र देशमुख ,दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक राजेश शेगोकार, सिटी न्यूज सुपरफास्ट अकोलाचे संपादक देविदास चव्हाण व लहूसेना फाउंडेशन अकोलाचे उपाध्यक्ष गजानन दांडगे यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे हे करणार असून संतोष इंगळे आभार मानतील.
समारोप समारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूरचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे व पूर्व संमेलनाध्यक्ष किशोर बळी ( युवा गीतकार, कवी, अभिनेता ) यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. या सत्राला प्रमुख अतिथी म्हणून वसुंधरा फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष सागर फुंडकर, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे ,विदर्भ साहित्य संघ खामगावचे अध्यक्ष विजय देशपांडे ,अंकुर साहित्य संघ बुलडाणाचे अध्यक्ष प्रा. मधुकर वडोदे ,विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशांत बोबडे, टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन बुलडाणाचे अध्यक्ष अमोल गावंडे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन घोंगडे अकोला , अंकुर साहित्य संघ यवतमाळच्या अध्यक्षा विद्याताई खडसे ,चित्रपट कलाकार डॉ.राजेश देशमुख ,जेष्ठ कवी मनोहर नागे व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिरभाते यांची उपस्थिती राहील. या सत्राचे सूत्रसंचालन मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार व अनंत शेळके हे करतील तर नारायण पिठोरे हे आभार मानतील.
राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे सहावे व शेवटचे सत्र गझल मुशायरा राहणार असून महाराष्ट्रातील नामवंत गझलकारांना या मैफिलीत ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.प्रसिद्ध गझलकार अभिजीत लागले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या गझल मुशायऱ्यात ज्येष्ठ गझलकार  शिवाजी जवरे ,सुप्रसिद्ध शायर डॉ गणेश गायकवाड यांच्यासह बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी  ललितकुमार वऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. गझल मुशायर्‍यात सतीश दराडे (बीड ), गौतम राऊत (गडचिरोली ), मंगेश जनबंधू (चंद्रपूर )यांच्यासह गोपाल मापारी ,दीपक फाळके ,एजाज खान, निलेश कवडे, सुरेश इंगळे, डॉ लक्ष्मण उगले ,रवींद्र जवादे ,निखिल चोपडे , डॉ.विशाल इंगोले ,योगेश देवकर ,अमोल गोंडचवर ,जयदीप विघ्ने , अरविंद उन्हाळे, अविनाश येलकर या गझलकारांचा समावेश राहील. गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन डॉ संघमित्रा खंडारे (दर्यापूर )व रमेश आराख (बुलडाणा ) हे करणार असून संदीप वाकोडे मूर्तिजापूर हे आभार मानतील.
खामगाव शहरात या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 20 जानेवारीला साहित्यिकांची मांदियाळी राहणार असून रसिकांना या साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती स्वागताध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान (अध्यक्ष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट खामगाव ) तसेच सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था अकोलाचे अध्यक्ष संतोष इंगळे ,तरुणाई फाउंडेशन खामगावचे अध्यक्ष नारायण पिठोरे ,संयोजक अरविंद शिंगाडे यांचेसह स्वागत व आयोजन समिती सदस्यांनी केले आहे.