क्षेत्राच्या विकासासाठी आणखी निधी आणणार : अग्रवाल

0
7

गोंदिया,दि.20ः-गोंदिया विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही, त्यामुळे अनेक नागरिक आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, नाली बांधकाम व पाण्याची समस्या नागरिकांना वेळोवेळी भेडसावत असते. या सर्व बाबीची आपल्याला जाण असून नागरिकांच्या सर्वांगिण विकास व्हावा, त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासन दरबारी सतत पाठपुरावा करून शासनाकडून निधी मंजूर करून परिसरासत विकासकामांना प्रोत्साहन देत आहोत. परिसराचा विकास कसा होईल, याकडे आपले लक्ष असून क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ते सावरी-लोधीटोला येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना बोलत होते. ग्राम लोधीटोला-सावरी येथे २५/१५ योजने अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात लोधीटोला येथे रस्ता बांधकामासाठी ३ लाखांचा निधी, सावरी येथे २.५ लाखाच्या निधीतून सभामंडप व ५ लाख रूपयांच्या निधीतून दोन रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाऊराव उके, जि.प.सदस्य कमलेश्‍वरी लिल्हारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पन्नालाल मचाडे, माजी सरपंच गेंदलाल बिसेन, टेकचंद शिहारे, सावरीचे उपसरपंच ईश्‍वर पटले, ग्रा.पं.सदस्या टेंभरे, ओमकार बिसेन, मयाराम हरिणखेडे, उमाशंकर तुरकर, प्रेमचंद बिसेन, योगेंद्र हरीणखेडे, हुसनलाल ठाकरे, किमुलाल ठाकरे, मोहन पटले, चंदन पटले, आत्माराम पटले, होमेंद्र पटले, भजनलाल कटरे, कार्तिक बिसेन यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.