सर्वांगीण विकासासाठी क्षेत्रातील जनतेच्या सहकार्याची गरज : विनोद अग्रवाल

0
16

गोंदिया,दि.21 : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेने मागील १५ वर्षांपासून ज्या लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवून सर्वांगीण विकासाची अपेक्षा ठेवली होती त्या जनप्रतिनिधीने या क्षेत्रातील जनतेची घोर निराशाच केली. आज आपण या क्षेत्रात पाहिले असता अनेक सोयी-सुविधांचा अभाव स्पष्ट दिसून येतो. मात्र, सदर जनप्रतिनिधी समस्या सोडविण्याऐवजी गोंदिया विधानसभा क्षेत्राचा विकास आपल्या माध्यमातून झाल्याचा गाजागाजा करीत आहे. मात्र, प्रत्यक्ष जनतेत जावून त्यांच्या समस्या जाणल्या, तेव्हा लक्षात येते की, आजही हा क्षेत्र विकासापासून वंचित आहे. अनेक अडीअडचणी व समस्या कायम आहेत. जाणिवपूर्वक या क्षेत्रातील लोकप्रतिनिधीने गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकासाची हवा निर्माण केली आहे व मागील १५ ते २० वर्षात या क्षेत्रातील जनतेचा नव्हे तर फक्त एका जनप्रतिनिधीचा विकास झाल्याचे आजघडीला पहावयास मिळत आहे. त्यामुळे जनतेपेक्षा स्वत:चे हित जपणाऱ्या अशा जनप्रतिनिधीला योग्य धडा शिकवा, असे आवाहन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम घिवारी येथे १४ लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला भाऊराव उके, रोहित अग्रवाल, घिवारीचे सरपंच राजु कटरे, उपसरपंच सुनिताबाई राधेश्याम नागपुरे, माजी सरपंच छोटीबाई धनलाल कटरे, ग्रा.पं.सदस्य संजय चौधरी, रेशमाबाई मेश्राम, रजनीबाई ठाकरे, ममताबाई लिल्हारे, छायाबाई मस्के, तंमुस अध्यक्ष हरीभाऊ खंडरे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.यानंतर विनोद अग्रवाल यांच्या हस्ते १४ लाखाच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश मस्के, सेवानिवृत्त शिक्षक लोकनाथपुरी वैकुंठी , मेघनाथ गौतम, माधोराव ठाकरे, बिसन नागपुरे, शंकर भगत, लोकचंद चौधरी, देवलाल रहांगडाले, सेवक मंडिया, बबुपरी वैकुंठी , ललेशपुरी वैकुंठी, बेनीराम सहारे, बाबुलाल पटले, फिरोज गौतम यांच्या घिवारी येथील गावकरी मोठया संख्येत उपस्थित होते.