बसपा राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींचा वाढदिवस उत्साहात

0
8
– विविध कार्यक्रमाचे आयोजन, गरजूंना कंबल वाटप
गोंदिया,दि.21 : जिल्हा बहुजन पक्षाच्यावतीने शहरातील आंबेडकर चौक परिसरातील तहसील कार्यालयसमोर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या वाढदिवस कल्याणकारी दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्र म्हैसकर, उषा बौद्ध, बसपा प्रदेश सचिव दिनेश गेडाम, पंकज वासनिक, जिल्हा बसपा प्रभारी पंकज यादव, डॉ. एल.एस. तुरकर, जिल्हाध्यक्ष धुरवास भोयर, विलास बौद्ध, कमल हटवार, अशोक अरखेल, छोटू बोरकर, अमर राऊत, आनंद बडोले, नुरलाल उके, विरू उके, सविता उके, डॉली गडपायले, कुंदा गाडकिने, प्रेरणा रामटेके, नुर निखद खान, बबलू तोलानी, नईम शेख, विकास साखरे, नगरसेवक लोकश यादव, संकल्प खोब्रागडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रावर मालयार्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. नंतर उपस्थित पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान केक कापून बसपा राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या वाढदिवस उत्साहात पार पडला. यावेळी संगीतमय आॅक्रेस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आॅर्केस्ट्रातील कलाकारांनी दिवसभर बहुजन नायकांचे गीत सादर करून उपस्थितांचे मन मंत्रमुग्ध केले. दरम्यान गरीब व गरजूंना कंबल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कमल हटवार यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष धुरवास भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहसीन खान,सोनू दास, ज्योतिप्रकाश गजभिये, रोशन कावडे, विरू उके, मंदिप वासनिक, कैलाश बोरकर, सेवक हनवत, अमित मेश्राम, जितेंद्र चंद्रिकापुरे, शिवदास साखरे, अनिल बावने, महेश वालदे, माधव फुंडे, सुनिल रोकडे, मोहित मराठे, लोकेश कोसरकर, सतीश वैद्य आदींनी सहकार्य केले.