बुद्धांच्या विश्वबंधुत्व विचाराची देशाला गरज-प्रफुल्ल पटेल

0
11

भंडारा,दि.21 : आज देशात अराजकता पसरली आहे. माणुस माणसाला ओळखत नाही. बालिका, तरुणी सुरक्षीत नाही. संविधान मुलतत्वाचे उल्लंघन होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशिष्ट चौकटीपुरते सिमीत समजु नये. डॉ. आंबेडकरांनी तथागत गौतम बुध्दाचे वैज्ञानीक विचार आपणास दिला. जगात सर्वात श्रेष्ठ काळानुरुप टिकणारे संविधान भारताचे आहे. परिणामी देशात सुख-समृध्दी व सामाजिक आर्थिक एकोपा निरंतर टिकत राहील, यासाठी बुध्दाच्या विश्वबंधुत्व विचारांची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

भीममेळावा पंचकमेटी तथा बौध्द विहार ट्रस्ट शहापूर द्वारा ७५ व्या अमृत महोत्सवी ऐतिहासीक भीम मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार जोगेंद्र कवाडे हे होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसचे  राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, माजी आमदार दिलीप बन्सोड, पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे, जि.प. चे माजी समाज कल्याण सभापती राजकपुर राऊत, विकास राऊत, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर गणविर, शैलेष मयुर, राजविलास गजभिये, मुंबईचे माजी शिक्षणाधिकारी तानबा डोंगरे, रिपाई जिल्हाध्यक्ष असित बागडे, पिरीपाचे जिल्हाध्यक्ष मदनपाल गोस्वामी, बी.एस. गजभिये, रमेश जांगडे, मनिष वासनिक, प्रकाश गजभिये, सुर्यभान गजभिये, पांडुरंग बेलेकर, सरपंच मोरेश्वर गजभिये उपस्थित होते. माजी आमदार दिलीप बंसोड म्हणाले, समाजामध्ये काळानुरुप परिवर्तन होणे गरजेचे आहे. राज्यकर्र्त्यांनी अंमलबजावणी करतांनी संविधानाची पायमल्ली करीत आहे. विहार हे विचार परिवर्तन करणारे केंद्र असावे, आर्थिक व सामाजिक विकास किती झाले हे तपासणे प्रत्येक समाजाचे कर्तव्य आहे. नाना पटोले म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची खरी गरज आहे. शासन गरीबांना अधिक गरीब करीत आहे गरीबांकडून वस्तु सेवा कर वसुल करीत आहे. संविधान असेल तर आपण राहू यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गुलाम बनविणाऱ्या शक्ती, समुहाचा, बुध्द आंबेडकर रुपी संविधानारुपी एकजुटीने नवी क्रांती घडविणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय भाषणात जोगेंद्र कवाडे म्हणाले, समाजाला सन्मानाने जगण्याचे आम्हाला शिकविले ते तथागत गौतम बुध्द तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. याचे विचार प्रत्येकान आचरणात आणावे, त्यानुसार समाजाचा विकास करा.पोलिस निरिक्षक सुभाष बारसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नविन बुध्द विहाराचे उद्घाटन लोकार्पण आणि स्मरणीकेचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. रात्रीला अशोक निकाळजे व स्वरा तामगाडगे आणि संच यांचा समाजप्रबोधनपर बुध्द गितांचा जुगलबंदीचा कार्यक्रम झाला. तिसºया दिवशी प्रबोधनकार अनिरुध्द बनकर यांचा ‘मी वादळ वारा’ कार्यक्रम झाला. प्रास्ताविक संयोजक मोरेश्वर गजभिये यांनी केले. संचालन अमृत बंसोड यांनी तर आभार दुर्योधन खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनोज चवरे, अशोक भिवगडे, जगदीश डोंगरे, तिर्थराज दुपारे देवेंद्र रामटेके, तोताराम मेश्राम, गणेश वाहणे, विनोद खोब्रागडे, नितेश गजभिये, वृषभ गजभिये, प्रशांत मेश्राम, अनमोल गजभिये, सचिन बेलेकर, सिध्दार्थ ढोके, लाला फुले, अतुल गजभिय, योगेश गजभिये, जितु फुले, अभिजीत वासनिक, रत्नघोष हुमणे, सोनु टेंभुरकर, संजय गजभिये, मंगला गजभिये, त्रिवेणी बेलेकर, छाया घरडे, अल्का पाटील, सीमा खोब्रागडे, निलीमा गजभिये, भाविका गोस्वामी, रंजु खोब्रागडे, उषा मेश्राम, सत्यवंता लांजेवार, सोनल खांडेकर, अल्का गजभिये, माया वैद्य, आशा जनबंधु, वंदना सरादे, अंजली गजभिये, सुषमा खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.