ग्रामीण भागातील रस्त्यांकरिता ५ कोटी मंजूर

0
9

तिरोडा,दि.21 : आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमाने धापेवाडा उपसासिंचन टप्पा क्र.१ चे पाणी खळबंदा जलाशयात यशस्वीरित्या सोडण्यात आले. व टप्पा क्र.२ चे पाणी बोदलकसा चोरखमारा जलाशयात सोडण्याच्या कामाला सुरुवात झाल्याबरोबरच ग्रामीण भागातही रस्ते, चावड्यांकरिता विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. यात मुंडीकोटा येथे सिमेंट रस्ता, नालीबांधकाम व आवारभिंतीकरिता २८ लाख, चिरेखनी येथे आवारभिंत व सिमेंट रस्ता बांधकामाकरिता ८ लाख, खैरलांजी येथे सिमेंट रस्ता, नाली, शाळेसमोरील भाग सौंदर्यीकरण, सामाजिक सभागृह, पेयजल योजना याकरिता १ कोटी १ लाख रुपये, सावरा येथे सिमेंट रस्ता, मजबुतीकरण ५.५० लाख, बोंडराणी सिमेंट रस्ता ३ लाख, पिपरिया येथे ३ लाख रुपये मंजूर करून या कामांचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कृउबास सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, जितेंद्र रहांगडाले, चत्रभुज बिसेन, घनश्याम पारधी, राजेश डोंगरे, सरपंच कमलेश, संगीता मनोहर बुद्धे, आतिलकर, प्रकाश भोंगाडे, शीला पारधी, खुशाल कटरे, खुशाल कडव, स्वप्निल भांडारकर, संगीता कोडवते, जाधोराव बुद्धे, मनोहर बुद्धे, कविता कडव, ललिता देव्हारे, अंजना कडव, राणी गोधुळे, अर्जुन कडव, मुख्याध्यापक आर.एस. गाढवे, भुमेश्वर शेंद्रे, तंमुस अध्यक्ष तुकाराम गोंधुळे व गावकरी उपस्थित होते.