परिक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांनी दिले तहसील कार्यालयासमोर धरणे

0
7
गोंदिया,दि.२२: तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सुकडी/डाक येथील इयत्ता १२ वीचे परिक्षा केंद्र नागपूर विभागीय परिक्षा मंडळाने बंद केल्याने त्या निर्णयाच्या विरोधात आज मंगळवारला(दि.२२) तिरोडा तहसिल कार्यालयासमोर परिसरातील शाळांच्या विद्याथ्र्यांनी धरणे आंदोलन  करुन परिक्षा केंद्र पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली.या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले,काँग्रेस ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष शिशुपाल पटले,सरपंच बाळु बावनथडे,उपसरपंच निलेश बावनथड,मिलिंद कुंभरे,गजानन पटले,ओंकार पटले आदी सुकडी परिसरातील पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने जिल्ह्यातील जि.प. कनिष्ठ महाविद्यालय सुकडी/डाक येथील एचएससी परीक्षा केंद्र क्र.७७० बंद केले असून ते सुरु करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व शालेय शिक्षक पालक समितीच्यावतीने आमदार विजय रहागंडाले यांची भेट घेऊन निवेदन सुध्दा सादर करण्यात आले.त्यानंतर आमदार रहांगडाले यांच्या पत्रासोबतच केंद्र सुरु करण्याचे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालकांना माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नागपूर येथे जाऊन दिले.तरी त्या निवेदनावर गांर्भीयाने लक्ष न देता शिक्षण मंडळाने केंद्र बंद ठेवण्याचेच धोरण स्विकारल्याने विद्यार्थी व पालकांनी तसेच या केंद्रावर नियमित विद्यार्थी परिक्षेला बसविणाèया शांळानी आंदोलनाचा मार्ग स्विकारत आज तहसिल कार्यालयासमोर राजकीय मतभेद बाजुला सारुन आंदोलन केले.त्यानतंर तहसिलदार संजय रामटेके यांच्या मार्फेत निवेदन पाठवून परिक्षा केंद्र पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली