शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले

0
10

अर्जुनी मोरगाव,दि.23 : सध्या ८ मामा तलावांच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून कामे त्वरित सुरू करण्यात येत आहेत. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या दृष्टीने मामा तलाव दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. शेतकरी हा आधारस्तंभ मानून शासन शेतीविषयक कामांना प्रथम प्राधान्य देत असल्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत धाबेटेकडी, चान्ना/बाक्टी, कवठा व कोकणा येथे ३ कोटी १० लाख रुपये मंजूर असलेल्या निधीच्या मामा तलाव दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भूमिपूजन म्हणून राजकुमार बडोले धाबेटेकडी येथे आयोजित सभेत बोलत होते. चारही भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अरविंद शिवणकर होते. यावेळी उमाकांत ढेंगे, केवळराम पुस्तोळे, लायकराम भेंडारकर, रघुनाथ लांजेवार, भोजराज लोगडे, शारदा नाकाडे, सरपंच ज्ञानेश्वर चौधरी, कल्पना संग्रामे, व्यंकट खोब्रागडे, नूतन सोनवाने, विनोद नाकाडे, कार्यकारी अभियंता एस.वाय. छप्परधरे, तहसीलदार धनंजय देशमुख, सहा. बीडीओ मयूर अंदेलवाड, मंदा कुंभरे, सरपंच दीपक सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते. .

२१ जानेवारी रोजी चार मामा तलाव दुरुस्ती कामाचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये धाबेटेकडी मामा तलाव दुरुस्ती कामाला ८३.९७ लाखाचा तर चान्ना/बाक्टी मामा तलावाला ६८.८० लाखाचा, कवठा मामा तलावाला ५७.९२ लाखाचा तर कोकणा मामा तलावाला ९८.६२ लाखांचा निधी असा एकूण ३ कोटी १० लाखाचा निधी राजकुमार बडोले यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आला आहे व प्रत्यक्ष या कामाचे भूमिपूजन होऊन कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. पुढे बोलताना बडोले म्हणाले, सध्याचे राज्यातील शासन हे शेतकरी व शेतमजूर यांच्याच हिताच्या कामांना प्रथम प्राधान्य देत आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीला उत्तम सिंचन व्हावे म्हणून मामा तलाव दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण रस्त्यांची कामे हातात घेण्यात आली असून ती पूर्णत्वाकडे जात आहे. प्रत्येक घरात उज्ज्वला गॅस पोहोचविण्यासोबत आयुष्मान भारत विमा योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचा पाच लाखाचा विमा काढण्यात येत आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ठोस पावले उचलली आहेत. वनजमिनीच्या कायद्यात ७५ वर्षांची अट असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून हा मार्गसुद्धा मोकळा करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहो. सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यासंदर्भात ही कार्यवाही सुरू आहे. घरकुल बांधकामासाठी रेतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये आणण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे, असे सांगून राजकुमार बडोले यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. नाजूक कुंभरे यांनी केले. चारही भूमिपूजनाला कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. .