भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध

0
11

*नक्षल पीडितांना मदत देण्याची शासनाकडे मागणी*

गडचिरोली,दि.२३ — नक्षलवाद्यांकडून होत असलेल्या निष्पाप नागरिकांच्या हत्येचा जोरदार विरोध गडचिरोलीत भारतीय मानावधिकार परिषद संलग्नित नक्षल पीडित पुनर्वसन समितीने केला असून नक्षली हल्ल्यात मारल्या गेलेल्या निर्दोष आदिवासींना तात्काळ मदत देण्यात यावी या मुख्य मागणीसह विविध मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आल.यावेळी मानवधकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे यांच्यासह मोठ्या संख्येने नक्षल पीडित उपस्थित होते
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप लावून नक्षलवाद्यांकडून अनेकांची हत्या करण्यात येत आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाडी आली आहे. नक्षलवाद्याच्या हिंसक कारवाईमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत.कसणासुर गावात झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते या घटनेत पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती गावकर्यांनी दिली असा आरोप करीत नक्षलवाद्यांनी कसणासुर गावातील मालू मडावी,कन्ना मडावी आणि लालसू कुडयेटी या तीन निष्पाप आदिवासींची हत्या केली व गावातील नागरिकांना नक्षल दहशतीमुळे आपले गाव सोडून पोलीस ठाण्यात आश्रय घ्यावा लागला.या परिसरातील नागरिक प्रचंड नक्षल दहशती आहेत.त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांच्या विरोधात भारतीय मानवाधिकार परिषद जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात नक्षलवाद्यांचा निषेध केला.नक्षल कडून ठार करण्यात आलेल्यांची कुटुंबियांना तात्काळ १० लाखाची मदत देण्यात यावी, नक्षल पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासन सेवेत नोकरी देण्यात यावी,नक्षल भीतीने आपले गाव सोडून भटकणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे, तसेच शहरी भागातील नक्षलवाद्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.नक्षल्यांची निषेध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नक्षलपीडित उपस्थित होते.
गजेंद्र डोमळे,dr. व्ही.एन. मडावी,मधुकर उसेंडी,मनोज कांदो, संदीप वागमारे,साईनाथ पेंडालवार,सुरेश नरोटी, बाबुराव धुर्वा, मनोज कोवासे,अशोक कोरसामी,सतीश गोटा,राजेश लेखामी, राजू दुर्वा,मधुकर मटामी,पेका मटामी,दुलसा नरोटे,लालसू नरोटे,रोशन बावणे,गौतम मेश्राम, सोनल पुंगाटी,अविनाश मेश्राम,संदीप मडावी,सचिन खोब्रागडे,अमित आदी उपस्थित होते.