स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा

0
12

गोंदिया,दि.24 : स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत जिल्ह्यात १ ते ३१ जानेवारीपयर्ंत स्वच्छ-सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट शौचालय सजावट करणार्‍या कुटुंबासह संबंधित ग्रामपंचायतीलाही पुरस्कृत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा कामाला लागली असून ग्रामपंचायत व लाभार्थ्यांनी सहकार्य करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत जिल्हा परिषद क्षेत्रामधील ग्रामपंचायतीमधील किमान १00 ते १५0 वैयक्तिक शौचालय उत्कृष्ट व कल्पकतेने रंगविणार्‍या ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. या ग्रामपंचायतीपैकी उत्कृष्ट व कल्पक चित्र रंगविणार्या कुटुंबाची निवड करून त्या कुटुंबाला ३ हजार रुपये रोख व दुसठया क्रमांकाचे पुरस्कार पटकाविणाठया कुटुंबाला २ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. वैयक्तिकस्तरावर प्रती जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय २ याप्रमाणे एकूण १0६ लोकांना २ लाख ६५ हजारांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायतस्तरावर १00 ते १५0 कुटुंबीयांचे वैयक्तिक शौचालय रंगविण्यात आले असेल तर त्यामध्ये सर्वाधिक शौचालय रंगविण्यात आलेल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील एका ग्रामपंचायतीची निवड करून त्या ग्रामपंचायतीला २0 हजारांचे असे एकूण ५३ ग्रामपंचायतींना १0 लाख ६0 हजारांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १५१ ते ३00 कुटुंबीयांचे वैयक्तिक शौचालय रंगविण्यात आले असेल तर जिल्हा परिषद क्षेत्रातील ३ उत्कृष्ट व कल्पक चित्रनिर्मिती करणार्या ग्रामपंचायतीला प्रत्येकी ३0 हजार रुपयांचा तर ३00 वैयक्तिक शौचालयापेक्षा अधिक शौचालय उत्कृष्ट व कल्पकतेने रंगविण्यात आलेल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील ३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४0 हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रीयस्तरावर होणार गौरव
सर्वाधिक शौचालय रंगविलेल्या ३ उत्कृष्ट जिल्ह्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात येणार आहे. या ३ जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायतींचे छायाचित्र राज्यस्तरावर पाठवायचे आहेत. राज्यस्तरावरून राष्ट्रीयस्तरावर पुरस्कारासाठी नामनिर्देशन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणार्या जिल्ह्यासह कुटूंबाचादेखील राष्ट्रीयस्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत गौरव केला जाणार आहे. तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत जिल्ह्यात १९ कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांना ग्रामपंचायती विभागून देण्यात आलेल्या आहेत. संबंधित गटसंसाधन केंद्रातील कर्मचार्‍यांना नेमूण दिलेल्या ग्रामपंचायतीत सर्वाधिक शौचालय रंगविले गेल्यास, त्यासाठी कार्य करणार्या गटसंसाधन केंद्रातील कर्मचार्‍यांचादेखील गौरव करण्यात येणार आहे.