सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड

0
7

अहेरी,दि.24ः- येथे नुकत्याच पार पडलेल्या १० व्या जिल्हास्तरीय कराटे अजिंक्य कराटे स्पर्धेत सिरोंचा येथील युवकांनी यश मिळविले आहे.त्यामध्ये अशोक बक्कय्या कुम्मरी रजत पदक व जगदीश पेद्दामदानय्या कुम्मरी याने काॅंस्य पदक मिळविले.या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा स्कूल आफ युजन पब्लिक स्कूल अहेरी येथे पार पडली.सेनसाई अली व सेनसाई योगेश चव्हाण तसेच प्रशिक्षण अक्षय कोवे यांचे मार्गदर्शन लाभले.अशोक बि. कुम्मरी, व जगदिश पि. कुम्मरी यांची गडचिरोली येथे होणार असलेल्या  राष्ट्रीय स्पर्धा करिता निवड झाली आहे.त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.