एक शाम राष्ट्र के नाम’ कवि संमेलन आज – भाजयुमोचे आयोजन

0
10
गोंदिया,दि.24 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सिव्हिल लाईन येथील महिला मंडळाच्या प्रांगणात २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘एक शाम राष्ट्र के नाम’ अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. रमेश कुथे, आ. अनिल सोले, आ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी खा. चुन्नीलाल ठाकूर, खुशाल बोपचे, माजी आ. केशव मानकर, खोमेश्वर रहांगडाले, भजनदास वैद्य, हरीश मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, रचना गहाणे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिप उपाध्यक्ष अलताफ हमीद तसेच सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कवि संमेलनात मुंबईचे कवि सागर त्रिपाठी, अमरावतीचे हास्यव्यंगकार किरण जोशी, लखनऊचे कमलआग्ेनय, राजीमचे काशीपुरी कुंदन, जबलपूरच्या अर्चना अर्जन, वाराशिवनीचे अंतू झकास, तुमसर प्रमोद पारखी आदी कवि सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा महामंत्री ॠषीकांत शाहू, ललीत मानकर, पंकज सोनवाने, अभय मानकर व सर्व पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी केले आहे.