आमच्या भागातून आंतरराष्ट्रीय जलतरणपटु तयार व्हावेत वर्षा पटेल

0
32

साकोली,दि.28ः- पोहणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. आपली शरीरयष्टी उत्तम टिकवुन ठेवायची असल्यास पोहणे आवश्यक आहे. आमच्या भागातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटु तयार व्हावेत आणि जलतरण क्षेत्रात जिल्ह्याला नवी ओळख प्राप्त होईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असे प्रतिपादन वर्षा पटेल यांनी केले.
शिवनीबांध जलतरण संघटनेतर्फे दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बक्षिस वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, निवृत्त पोलिस अधिकारी विनोद पटोले, माजी आमदार सेवकभाऊ वाघाये, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, राजेश बांते, मनिष कापगते, सचिन रंगारी उपस्थित होते.
रविवारला सकाळपासून जलतरणपटूंनी आणि क्रीडाप्रेमींनी शिवनीबांध जलाशय येथे गर्दी केली होती.या जिल्ह्याच्या विकासात खेळाडूंची विशेषतः जलतरणपटूंची गरज लक्षात घेता त्यांना नवनवीन सुविधा देण्याचा आमचा माणस असेल तसेच शिवनीबांध जलाशयाला पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास आनण्यासाठी आपन सर्वतोपरी प्रयत्न करू असं प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले.
स्पर्धेत सर्व गटात पुरुष व महिला अशा दोहोंना पहिला, दूसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक देण्यात आला. ११ वर्षाखालील मुलांमधून सिद्धार्थ संघा, इशांत चवरे, स्वर्णिम महाजन राजवीर रावत, अमोघ कंदगुळ यांनी तर ११ वर्षाखालील मुलींमधून स्वराली साळुंखे, राधिका वानखेडे, मृदुल टोंगे, श्रेया भेंडारकर, अनुभा सोरते यांनी क्रमांक पटकावला.
दुसऱ्या गटात १४ वर्षाखालील मुलांमधून स्वराज गद्देलपल्लीवार, दक्ष फडके, अर्जुन वरांडे, ऋषिकेश बाटवे, राघव भार्गव तर मुलींमधून संजना जोशी, साना नेवारे, सोहिनी मुखर्जी, प्रेरणा चापले, भूमिका कोकोडे यांनी क्रमांक पटकावला. यांच्यासाठी १ किमी अंतर होते. तिसऱ्या गटात १७ वर्षाखालील मुलांमधून तुषार परमार, साहिल तरळे, मो. उजैर जमील, अक्षय कुंभरे, प्रियांशु नशिने तर मुलींमधुन हिमानी फडके, प्रियांशु सोरते यांनी क्रमांक पटकावला. यांच्यासाठी २ किमी अंतर होते. चौथ्या गटात ३० वर्षाखालील पुरुष गटामध्ये नकुल भोयर, नचिकेत बाटवे, निकेश दोनोडे, दशरथ पंचेश्वर, हिमांशु मेश्राम तर महिलांमधुन शरयु फरतोडे, ऋषिका बोदेले, रिद्धी परमार, श्रेया ठाकरे, समिक्षा लांडगे यांनी क्रमांक पटकावला.
पाचव्या गटात ४५ वर्षाखालील पुरुष गटामध्ये आदित्य कलेले, प्रशांत कारेमोरे, उदय कोल्हे, प्रदीप वलथरे, विराग सोनटक्के तर महिलांमधुन ईश्वरी वाटकर, रंजना वानखेडे, सपना साखरकर, सोनाली पाठमासे यांनी क्रमांक पटकावला. सहाव्या गटात ५५ वर्षाखालील पुरुष गटामध्ये अनिल लांबट, जनार्दन दोनोडे, गणेश क्षीरसागर, प्रल्हाद डोंगरवार, योगेश शक्तिकर, तर महिलांमधुन वंदना कदव, सुनीता धोटे, देविता पटले यांनी क्रमांक पटकावला.
सातव्या गटात ५६ वर्षावरिल पुरुष गटामध्ये उदाराम पेंदम, शिवराज माळवी रविंद्र तरारे, नारायण तांबूळे, चन्द्रकांत मगर तर महिलांमधुन डॉ. राजश्री जैन, चंद्रमा पिंगळे यांनी क्रमांक पटकावला. आठव्या गटात दिव्यांग पुरुषमध्ये तुषार फुंडे, शुभम मेश्राम, शंकर आष्टनकर, कृष्णदास सोरदे, नाशिक झंझाड व महिलामधून सश्रुति नाकाडे,अंजली भूते यांनी क्रमांक पटकावला. प्रत्येक गटात ३०००, २५००, २०००, १५००, १००० अशी रोख पारितोषिक देण्यात येतील. व प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व मेरिट प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल व प्रमानपत्र देण्यात आले.
या राज्यस्तरिय स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत ते सहभागी झाले होते. मान्यवर तथा सर्व पदाधिकाऱ्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.