गुरूबसव पतसंस्थेत तहसिलदार अर्चना पाटील यांचा सत्कार

0
12

संख(ता.जत),दि.30ःः येथील श्री गुरूबसव नागरी सह. पतसंस्थेच्या वतीने अप्पर तहसिलदार अर्चना पाटील यांचा सत्कार करण्यात आला.नव्याने आलेल्या अप्पर तहसिलदार पाटील यांनी संख अप्पर तहसिल कार्यालयातील कामकाजाला चांगली गती दिली असून नियोजन केल्याने नागरिकांची कामे व्यवस्थित होऊ लागली आहेत.सामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्यार्या अधिकाऱ्यांचा गौरव व्हावा या उदेशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या चेअरमन सौ. सुरेखा पाटील यांनी अप्पर तहसिदार अर्चना पाटील यांचा फेटाबांधून सत्कार केले .यांवेळी श्रीमती पाटील यांनी सांगितले कि सर्व गावांचा विकास कामे करण्यासाेबतच प्रशासनीक कामकाज व्यवस्थित करुन सर्वांना न्याय देण्याच प्रयत्न राहील.संस्थेचे संस्थापक गुरूबसव आर.पाटील ,व्हा.चेअरमन अहमद शेख ,सर्व संचालक मंडळ , श्री गुरूबसव विद्यामंदिर कॉलेज चे मुख्याध्यापिका ज्योती पाटील ,प्रा.आर.बी.पाटील सर ,तमण्णा बागेळी आदी मान्यवर उपस्थित होते .