शेडनेट पॉलिहाऊस मध्ये फुले व भाजीपाला लागवडीस शेतकऱ्यांना अनुदान द्या

0
46
नांदेड,दि.31:- कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत नियंत्रित शेती शेडनेट पॉलिहाऊस मध्ये फुले व भाजीपाला लागवड साठी पूर्वसंमती अनुदान यावर्षी अद्यापही एकाही शेतकऱ्याला दिली नाही, त्यामुळे या योजनेत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी पूर्वसंमती देऊन अनुदान द्यावे अशी मागणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी निवेदनाव्दारे राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
कृषी विभागाकडून दरवर्षी शेडनेट पॉलिहाऊस मध्ये शेतकऱ्यांना फुले व भाजीपाला लागवडीसाठी अनुदान देण्यात येते,या योजनेत शेडनेट, पॉलिहाऊस धारक शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतात. यावर्षी शेकडो शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. परंतु या एकाही शेतकऱ्यांना अद्यापही लागवडीसाठी पूर्वसंमती किंवा अनुदान देण्यात आले नाही यामुळे राज्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. याबाबत भागवत देवसरकर यांना समजले असता त्यांनी राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देऊन व विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व फलोत्पादन विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या बाबतीतची सविस्तर माहिती दिली व ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी पूर्व संमती देण्याची व हा प्रश्न निकाली काढावा अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी निवेदनात केली आहे.