पीपी काॅलेजमध्ये माहिती अधिकार कार्यशाळा

0
16

गोंदिया,दि.31ः- जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य.) गोंदिया व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी(यशदा),पुणे.यांच्या सयुंक्त विद्ममाने येथील पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा ३० जानेवारी ते २ फेबुवारीपर्यंत राहणार आहे. महाविद्यालय व शाळामधील कर्मचारी यांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याबाबत सविस्तर माहिती असावी या हेतुने शिक्षण विभाग व यशदाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यावरुन आनंद मानुसमारे,ओमकारसिंह पाटील,प्रविण जिंदम उपस्थित झाले आहेत.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी महेंन्द्र मोटघरे,शिक्षक मनोज रांहागडाले, बन्सीधर शहारे वसुरेश बघेले सहकार्य करीत आहेत.