गोरेगावात खादी ग्रामोद्योगच्यावतीने मेळावा

0
23

गोरेगाव,दि.31ःः येथील पंचायत समितीच्या सभागृहात खादी ग्रामोद्योग आयोग (PMEGP/KVIC/DIC), जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्यावतीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती माधुरीताई ऋषीपाल टेेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले.मंचावर जिल्हा उद्योग कार्यालयाचे निरीक्षक रमाकांत राठोड़,महाराष्ट्र राज्य खादी ग्रामउद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ए.म.मोहोड, खादी ग्रामउद्योग आयोगाचे सहा.निदेशक राजेंद्र खोडके,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गिर्हेपुंजे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम बाबत माहिती देत रोजगार मिळविण्यासाठी तसेच उद्योगासंबधी माहिती देण्यात आली.