गोसलिया कॉलेज मिरज येथे पालक सभा

0
24

सांगली,दि.01ः- जिल्ह्यातील मिरज येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनियर कॉलेज ऑफ द एज्युकेशन मिरज येथे पालक सभा उत्साहात पार पडली.या सभेला प्रथम व द्वितीय वर्षातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.टी शिंगे होते. शिंगे यांनी पाल्याबाबत पालकांची भूमिका काय असावी, पालकांनी पाल्याला समजून घ्यावे व त्यास अभ्यासाला वेळ द्यावा. तसेच अध्यापक विद्यालयात चालणाऱ्या उपक्रमात पाल्याने उत्साहाने भाग घ्यावा यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहित करावे. मुलांनीही आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा त्याच्या धडपडीचा विचार करून जास्तीत जास्त अभ्यास करून जीवनात यश संपादन करावे असे आवाहन केले.वाघमारे ,साजिद शेख,व्हनमोरे या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रथम वर्षे वर्ग शिक्षक प्राध्यापक माने व्ही.व्ही. व व्दितीय वर्ष वर्ग शिक्षक प्राध्यापक पांढरे यु.जी .यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्राध्यापक पाटील एस.जे.प्राध्यापक पाटील व्ही.पी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक पांढरे यु.जी. यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक पाटील एस.जे यांनी मानले .