मुख्य बातम्या:

प्रौढ कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देणे कर्तव्य-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.03 : कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे मात्र विदेशी खेळांच्या स्पर्धेत हा खेळ लुप्त होत होता. एकेकाळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कबड्डी स्पर्धा मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यामुळे चांगले खेळाडू सुध्दा तयार होत होते. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी नाव केले आहे. त्यामुळेच या खेळाला पुर्नजीवीत करण्यासाठी प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना मंच उपलब्ध करुन दिला आहे. प्रौढ कबड्डी स्पर्धेला प्रोत्साहान देणे आपले प्रथम कर्तव्य असल्याची ग्वाही आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिली.
तालुक्यातील बिरसोला येथे शुक्रवारी (दि.१) आयोजित प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कत्तेलाल मात्रे, माजी जि.प.सदस्य रुद्रसेन खांडेकर, देवेंद्र मानकर, राजेश जमरे, अमृत तुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद तुरकर, आशिष चव्हान, मुलचंद देशकर, पं.स.सदस्य प्रकाश देवाधारी, उपसरपंच निर्वताबाई पाचे, लोकचंद दंदरे, बबीता देवाधारी, पोलीस पाटील दिलीप तुरकर, कपुरचंद पाचे, रामभगत पाचे, कांतीबाई पाचे, डॉ.देवा जमरे, कविता दांदरे, सरोजनी दांदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, संजय देवाधारी, बालाराम खैरवार, रुखी पाचे, माणिकचंद तुरकर, श्यामराव तुरकर, कैलाश देवाधारी उपस्थित होते.

Share