शाळेच्या प्रगतीसाठी समाजानेही जबाबदारी स्विकारावी- गट नेते गंगाधर परशुरामकर

0
10

सडक अर्जुनी,दि.09ःःशाळा ही सामाजिक संस्था असून कर्मचारी शाळेला प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करीत असले तरी त्यात उर्जा प्रदान करण्याची जबाबदारी समाजानेही स्विकारण्याची गरज असल्याचे विचार जिल्हा परिषदेचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले आहे.ते आदिवासी विकास हायस्कुल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों.च्या वतीने आयोजित देशभक्तिपर रंगारंग सांस्कृतिक समारोपीय कार्यक्रम व 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
पुढे परशुरामकर म्हणाले की हा युग संगणकाचा आहे.शाळेला डिजीटल वर्गाची सोय होणे तथा स्पर्धा पुस्तकांचा पुरेशा साठा शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध होणे अनिवार्य आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काळात 1 लाख रूपये किंमतीच्या पुस्तका स्पर्धा परीक्षा पुर्व तयारी करीता शाळेला जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास निधीतून देण्याची घोषणा केली.
मुख्य बक्षिस वितरक पंचायत समितीचे उपसभापती राजेश कठाणे यांनी डिजीटल शाळा बनविण्याचे आर्थिक खर्चाचे अंदाजपत्रक सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना शाळेने सादर केल्यास निवडणुकीपुर्वी शाळा डीजीटल करण्यास आर्थिक निधी हमखास देऊ असे आश्वासन दिले.
याप्रसंगी विचारमंचावर जि.प.माजी उपाध्यक्षा छायाताई चौव्हाण,सरपंच सत्यशिलाताई गायकवाड,उपसरपंच नरेंद्र देहा,माजी उपसरपंच उमराव मांढरे,प्राचार्य खुशाल कटरे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष किशोर वंजारी,बोथलीचे सरपंच नरेश चौव्हाण,उपप्राचार्य बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक आर.के.कटरे ,प्रा.वाय.टी.परशुरामकर,स.शि.डी.डी.रंहागडाले.उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले.संचालन जी.टी.लंजे ,प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी केले.आभार प्रा.एस.जे.रामटेके यांनी मानले.कार्यक्रमाचे समापण स्नेहभोजनाने करण्यात आले.