प्रोगेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद

0
22

गोंदिया,दि.13 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयतर्फे १0 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १0.३0 वाजतापर्यंत स्थानिक सुभाष गार्डन येथे भव्य चित्रकला स्पध्रेचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पध्रेत प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रयांचा माध्यमातून उत्कृष्ट कला दर्शविली. या प्रतियोगिते मध्ये गट अ, ब, क, ड, व ई अशा पाच गटात स्पर्धा घेण्यात आली व प्रथम, द्वितीय, तृतीय व चार प्रोत्साहन पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहर वाहतूक शाखेचे एपीआय संजय सिंग, माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गुरूकुल कॉन्व्हेंटचे संचालक मुरलीधर माहोरे, जेसीआय अध्यक्ष अश्‍विनी केंद्रे, संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, उपाध्यक्ष अल्का कटकवार, सहसचिव पद्मा कटकवार, कोषाध्यक्ष ज्येाती पहिरे, प्राचार्य अभय गुरव यांच्या हस्ते विजेते विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन त्यांना गौरान्वित करून प्रोत्साहित केले. तसेच स्पध्रे बरोबरच चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत येणार्‍या विविध चित्रांची प्रदर्शनी लावली होती.
स्पध्रेच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, कुलदिप भौतिक, विणा कावळे, कृष्णा चौहान, निधी व्यास, वर्षा सतदेवे, दयावंता राऊत, मिनाक्षी महापात्रा, रूपकला रहांगडाले, विकास पटले, प्रमोद वाडी, कल्याणी रहांगडाले, गिरीश बावनकुडे, तुमेश पारधी, रिना शहु, भानुलता लावेटी, सिमरन बास्के, शितल मेंढे, कन्हैया आंबाडारे, भारती गाढवे, गुरूदास भेलावे, वृंदा लारोकर, पालेंद्र गावळ, अंकुर गजभिये, राहुल रामटेके, दिव्यांशु जैस्वाल व सर्व अध्यापकवर्गांंनी सहकार्य केले.