प्रा.राजू पटले यांना हिंदी विषयात आचार्य पदवी

0
25

गोंदिया,दि.13ः- येथील एनएमडी महाविद्यालयातील हिंदी विभागाचे अंशकालीन अधिव्याख्याता प्रा. राजू रामशंकर पटले यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिंदी विषयात आचार्य पदवी प्रदान केली. सी.जे. पटेल महाविद्यालय तिरोडाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. मृणाल मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली २१ वी शताब्दी के प्रथम दशक की महिला कहानिकारों का समाज या विषयावर अभ्यासपूर्ण शोधप्रबंध रातुम नागपूर विद्यापीठास सादर केला. विद्यापीठाच्या १0६ व्या दीक्षान्त समारंभात कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह नागपूर येथे पीएच.डी. प्रदान करण्यात आली. यशाचे श्रेय गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, प्राचार्य डॉ. रजनी चतुवेर्दी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. मस्तान शहा यांना दिले तर गुलशन बिसेन, सत्यशील चव्हाण, एच.सी.टेंभरे, सुधीर कुमार गौतम, डॉ. शारदा महाजन, प्रा. बबन मेर्शाम, प्रा. आशा बघेले, प्रा. पणय बिसेन व मित्र परिवाराने अभिनंदन केले.