मुख्य बातम्या:

गोरेगावात राशन कार्डचे आधार कार्डशी सत्यापण सुरू

गोरेगाव,दि.१४ः-  : राशन कार्ड धारक कुटुंबातील सर्व सभासदांच्या नावाची योग्य नोंद व्हावी म्हणून आधार कार्ड शी सत्यापन करून योग्य नोंदी घेण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने शिबिराचे आयोजन  १३ फेब्रुवारी ला जि.प. प्राथमिक शाळेत करण्यात आले होते.
या शिबिरात न.प.अध्यक्ष आशिष बारेवार, सभापती हिराभाऊ रहांगडाले, रवींद्र चन्ने, मलेशाम येरोला, पो.पा.शारदा शहारे, राशन दुकानदार अरविंद जयस्वाल, कैलास कावळे, शैलेश मेर्शाम, विक्की सांगोडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शारदा महिला मंडळ,शैलेश मेर्शाम, कैलास कावळे या तिन्ही दुकानातील कार्डधारकांचे सत्यापण करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयातर्फे फुड इंन्सपेक्टर सचिन काडे,समिर मिर्झा, गोदाम व्यवस्थापक तवले, पर्यवेक्षक उत्तम कटरे प्रामुख्याने उपस्थित होते. सत्यापण शिबिर हे १३ ते २८ फेब्रुवारी पयर्ंत चालणार आहे करिता सर्व कार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील सर्व सभासदांना आधार कार्ड घेऊन सत्यापण करणे गरजेचे आहे. आधार कार्डशी सत्यापण न केल्यास राशन काडार्तून नाव वगळल्या गेल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे तहसील कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share