गुदमा व मोरवाही येथे ३ लाखाच्या निधीतून विकासकामाचे भूमिपूजन

0
5

गोंदिया दि.१४ः- : भाजपचा सरकारने मागील ४ वर्षापासून सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍यासाठी अनेक जनकल्याणकारी कामे केली. सर्वसामान्यांचा विकास आणि शेतकर्‍यांचा सन्मान भाजपने केला.अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी भाजप सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना वर्षाकाठी ६ हजार रूपये देण्यात येणार असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम गुदमा येथे ५ व मोरवाही येथे ३ लाख रूपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी भूमिपूजक म्हणून ते बोलत होते. मोरवाही येथे २५-१५ लेखाशिर्षक अंतर्गत ३ लाख रूपयांच्या निधीतून धोबीघाट सौदर्यीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाउफ्राव उके, सुजित येवले, सरपंच राधेश्याम भिमटे, ग्राम अध्यक्ष पवन हेमणे, राजु ब्राम्हणकर, चंद्रभान ङ्खाकूर, अनिता हेमणे, प्रकाश शिवणकर, देवानंद सतदेवे, लक्ष्मण खोटेले, जितू हेमणे, कारू दुबरकावळे, तुलसीदास शिवणकर, कुंवरलाल शिवणकर, अजय भालाधरे, मोतीराम र्ब्राम्हणकर, कैलाश चौधरी, सुरज हेमणे, ताराचंद हेमणे, अनिल हेमणे, पप्पु पारधी, युवराज पारधी, किशोर पारधी, संजय कावळे, गोपीचंद हेमणे, राजेश शिवणकर, गुडडू चौधरी, लालचंद चौधरी, रतीराम भलावी, संपत शिवणकर, प्रभुदास साउसकार, रामु बिसणे, सोहनलाल नेवारे आदिंसह गावकरी उपस्थित होते.तर गुदमा येथे २५-१५ लेखाशिर्षक अंतर्गत ५ लाख रूपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाऊराव उके, सुजित येवले, दिनदयाल गायधने, शिवानंद पटले, शामलाल बोहरे, रविशंकर तिवारी, मगनलाल ढेकवार, घनश्याम वाढई, वन्निड पाथोडे, बकाराम गायधने, पुर्णिमा तिवारी, ममता तिवारी, यादोराव गायधने यांच्यासह शिवाजी समितीचे सदस्य, पदाधिकारी व गुदमा, हेटीटोला येथील गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.