मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

अनेक मान्यवरांची कृषी प्रदर्शनाला भेट

गोंदिया दि.१४ः: स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरित करून गुणवत्तेला वाव देणे आणि मनोहरभाईंच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आयोजित गोंदिया येथील डी.बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणात भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याआधी गोंदिया जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळभाज्यांसह विविध पिकांच्या प्रदर्शनाला सोहळ्याचे उद्घाटक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, प्रख्यात अभिनेता संजय दत्त, उद्योगपती अनिल अग्रवाल व सोबत आलेल्या मान्यवरांनी भेट दिली. .

खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून प्रगत शेतीकडे वळल्याचे आणि उत्पादित फळ व पिकांची गुणवत्ता तसेच शरीरासाठी कसे लाभदायक आहे, हे पटवून दिले. स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंती सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात पिकविला जाणारा भात, विविध भाज्या, कृषी उत्पादन, फळे, वनस्पती, पारंपरिक बियाणे, ॲकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या प्रेरणेने गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी बनविलेल्या पर्स व इतर वस्तू तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय जीवनातील विविध कामांची माहिती यावेळी देण्यात आली. या कृषी प्रदर्शनाचे नियोजन संचालक निखिल राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कोबी, पपई, केळी, स्ट्रॉबेरी, शेवग्याच्या शेंगा यासह अनेक फळे व भाजीपाला ठेवण्यात आला होता. .

यावेळी लावण्यात आलेले स्टॉल जसे व्हेजिटेबल व फ्रुटसाठी भालचंद्र ठाकूर, पारंपरिक बियाण्यांसाठी देवेंद्र राऊत, आधुनिक कृषी करण्यासाठी विविध यंत्रांच्या स्टॉलसाठी गिरीश भिवगडे यांनी सहकार्य केले. कृषी प्रदर्शन व विविध वस्तूंच्या प्रदर्शनासाठी डॉ. प्रशांत सहारे, भावेश जसानी, भारतभूषण बघेले, स्नेहा जायस्वाल, शीतल बॅनर्जी, आरूषी पटले, कविता पटेल, जवेरीया शेख, अल्का पाटील, रत्ना बिश्वास, दीप्ती बाजपाई, आशा बघेले, भारती कावळे, टी.एम. टेंभरे, दिशा गेडाम, नीलम आगाशे आदींनी सहकार्य केले.

Share