भंडारा नगरपरिषद सभापतींची अविरोध निवड

0
14

भंडारा   दि. १४ : : : येथील नगरपरिषदेच्या विविध विषय समिती सभापतींची निवड गुरुवारी अविरोध पार पडली. यात भाजपा नगरसेवकांचे वर्चस्व कायम राहिले.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी कैलाश तांडेकर, महिला व बाल विकास समिती सभापतीपदी वनिता कुथे, उपसभापतीपदी आशा उईके, शिक्षण सभापतीपदी चंद्रकला भोपे, नियोजन आणि विकास सभापतीपदी रजनीश मिश्रा तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी ब्रिजमोहन कटकवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड अविरोध व्हावी यासाठी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी प्रयत्न केले.
भंडारा नगरपरिषदेची कारकिर्द सांभाळत भाजपाला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यात तिसऱ्यांदा गुरुवारी सभापतींची निवड करण्यात आली. पीठासीन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकृष्णनाथ पांचाळ (आयएएस), मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते. तर या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशू गोंडाणे, चंद्रशेखर रोकडे, नगरसेवक कंवलजित सिंह चढ्ढा, संजय कुंभलकर, नितीन धकाते, मकसूद खान, दिनेश भुरे, जाबीर मालाधारी, शमीम शेख, सुनील साखरकर, विनयमोहन पशिने, उमेश ठाकरे, विक्रम उजवणे, बाबू बागडे, नगरसेविका भूमेश्वरी बोरकर, साधना त्रिवेदी, मधुरा मदनकर, शमीमा शेख, गीता सिडाम, ज्योती मोगरे, कल्पना व्यास, कविता भोंगाडे, जुमाला बोरकर, स्मिता सुखदेवे उपस्थित होते.