सैनिक स्कूल पाञता व स्काॅलरशिप परिक्षा एकाच तारखेला

0
62

संख(राजभक्षर जमादार),दि.15ः-: राज्यातील  इयत्ता पाचवी च्या सैनिकीस्कूल पात्रता प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी 24 फेब्रुवारीला एकाच दिवशी  फक्त दीड तासाच्या अंतराने होणार आहे. विद्यार्थीसमोर कोणती परीक्षा द्यायची याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.  मुलांच्या मानसिकता हित व त्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये म्हणून दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या दिवशी घेतल्या जावीे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे .सांगली जिल्हात शिष्यवृत्ती परीक्षेकरीता पूर्व उच्च प्राथमिक (इ.5वी) शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी संख्या 18 हजार 778 असून परीक्षा केंद्र – 206 एवढे ठरविण्यात आले आहे.

संपूर्ण देशभरात सैनिकी स्कूल प्रवेश परीक्ष ६जानेवारी २०१९रोजी झाल्या. राज्यातील आठ केंद्रावर या परीक्षा झाल्या.सातारा सैनिक स्कूल हे प्रतिष्ठान स्कूल आहे.देशातील पहिले सैनिक स्कूल आहे दरवर्षी सहावी व नववीसाठी प्रवेश दिला जातो.या शाळेत मुलींना प्रवेश दिला जात नाही ही परीक्षा ओएमआर पध्दतीने घेतली जाते.त्यामध्ये उत्तरे बहुपर्यायी असतात..परीक्षेत कोल्हापूर व सातारा या परीक्षा केंद्रावर गोंधळ झालेला होता. सातारा येथील सैनिक स्कूल व पोद्दर इंटरनॅशनल स्कूल या परीक्षा केंद्रात मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचा पेपर तर इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी माध्यमाच्या पेपर देण्यात आल्या. कोल्हापूर येथे पहिली पेपर लवकर काढून घेण्यात आला आहे. तसेच परीक्षेत नववीतील काही प्रश्न पाचवीतला विचारण्यात आलेले आहेत.तांत्रिक चुकांही आणि पेपर वेळेतील फरक यामुळे अनेक पालकांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती.अश्या प्रकारच्या चुका अन्य राज्यातही झालेल्या आहेत. त्यानुसार  ही परीक्षा महाराष्ट्र उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यात फेर परीक्षा होणार आहेत. . सैनिक स्कूलने 24 फेब्रुवारीला जाहीर केली आहे.इयत्ता ५वी च्या मुलांना पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आली आहे .

याच दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदची पाचवी स्काॅलरशिप परीक्षा होणार आहे .दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने पाचवीची स्काॅलरशिप परीक्षाचे परिषदने फक्त वेळात बदल केला आहे.यामध्ये स्काॅलरशिप परीक्षेचा पहिला पेपर दुपारी 1 ते 2:30  ला दुसरा पेपर 3 ते 4:30 ला होणार आहे.सैनिक स्कूल परीक्षाला कोल्हापूर व सातारा केंद्र आहे.ही केंद्र 200 किमी अंतरावर आहेत. दीड तासात केंद्रावर जाणे शक्य नाही.विद्यार्थी व पालकासमोर दोन्ही परीक्षापैकी एकाची निवड करावी लागणार आहे.विद्यार्थीनी परीक्षेची तयारी केलेली आहे.पुस्तकावर हजारो रुपये खर्च केलेले आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदने फक्त पालकाची सहानभूती मिळविण्यासाठी फक्त दोन्ही पेपर मधील वेळ बदल केला पण जत सारख्या दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रवास करून ती मुले  शिष्यवर्ती परीक्षा कशा देणार ? असा सवाल पालकातून व्यक्त होत आहे . नाहीतर सैनिकी प्रवेश परीक्षा मुले देतील तिथे मुलाचे पेपर घेण्याची व्यवस्था करावी.अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. ” इयत्ता पाचवी च्या मुलांच्या वयाचा विचार करता महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने दोन्ही पेपरमधील वेळ न बदलता तारीख बदलावी” – गजानन पाटील पालक,दरीबडची ( जत )