गोंदियात आरोपीकडून खुनाचा प्रयत्न 1 आरोपी जाळ्यात

0
25

गोंदिया,दि.15ः- गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या इसरका मार्केटपरिसरात 3 अज्ञात नकाबपोश आरोपींनी गोळीबार केले सोबतच तलवारीने हल्ला केल्याने यादव चौक निवासी शिव यादव जखमी झाल्याची घटना आज रात्री दरम्यान घडली.यात शिव यादव जखमी झाला असून त्याला केटीएस वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे.यादवच्या डोक्यावर व हाताला लागल्याचे वृत्त असून आरोपीपैकी एकाने पोलीसासमोर आत्मर्पण केल्याचे वृत्त असून गोंदिया शहर पोलीस याप्रकरणात तपास करीत आहे.